तुफान गर्दीमुळे कोरोना नियमांची पायमल्ली, टीका होताच युवासेनेचे सर्व मेळावे रद्द, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर निर्णय

| Updated on: Aug 19, 2021 | 10:25 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमांत गर्दी होऊ नये म्हणून युवासेनेचे मेळाव रद्द करण्यास सांगितले आहे. यानंतर आता फक्त युवासेनेच्या प्रमुख पदाधिकऱ्यांसोबत बैठक होईल.

तुफान गर्दीमुळे कोरोना नियमांची पायमल्ली, टीका होताच युवासेनेचे सर्व मेळावे रद्द, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर निर्णय
सांकेतिक फोटो
Follow us on

मुंबई : शिवेसनेचा विस्तार तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन युवासेनेतर्फे राज्यभर पदाधिकारी संवाद दौरे केले जात आहे. सध्या कोरोनाचे सावट असूनदेखील या कार्यक्रमांत मोठी गर्दी होत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमांत गर्दी होऊ नये म्हणून युवासेनेचे मेळाव रद्द करण्यास सांगितले आहे. यानंतर आता फक्त युवासेनेच्या प्रमुख पदाधिकऱ्यांसोबत बैठक होईल. वरील माहिती युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (all yuva sena samvad melava has been cancelled due by uddhav thackeray due to corona)

गर्दी होऊ नये म्हणून सर्व मेळावे रद्द

उद्धव ठाकरे यांचे निर्देश तसेच सध्याची कोरोनास्थिती याबाबत सरदेसाई यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये म्हणून युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्यातील सर्व मेळावे रद्द करण्यात येत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील युवासेनेचे सर्व मेळावे रद्द करण्यात आले असून फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे,” असे सरदेसाई म्हणाले.

युवासेनेच्या मेळाव्यांत तुफान गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन

युवासेनेतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांत युवा मेळावे घेतले जात आहे. मेळावे आणि संवादाच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्याचा शिवसेना तसेच युवासेनेकडून प्रयत्न केला जात आहे. 13 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत सरदेसाई यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला होता. तशीच परिस्थीती नाशिकमध्ये 7 ऑगस्ट रोजी निर्माण झाली. याबाबत विचारले असता शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली, असं उत्तर देत वेळ मारून नेली होती.

यानंतर फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार

त्यानंतर आता युवासेनेच्या संवाद मेळाव्यात होणारी गर्दी आणि कोरोना नियमांचे होत असलेले उल्लंघन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्यातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील सर्व युवासेनेचे मेळावे रद्द करण्यात आले आहेत. येथे फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

इतर बातम्या :

नागपुरात लसीकरणाला गती, आरोग्य विभागाच्या ताफ्यात 200 लसीकरण वाहनं दाखल होणार

‘भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल’, नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर

Gujrat Love Jihad : हायकोर्टाचा मोठा निर्णय, केवळ लग्न केलं म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही!

(all yuva sena samvad melava has been cancelled due by uddhav thackeray due to corona)