नागपुरात लसीकरणाला गती, आरोग्य विभागाच्या ताफ्यात 200 लसीकरण वाहनं दाखल होणार

आज नागपूर मनपाच्या केंद्रामध्ये कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे 18 वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

नागपुरात लसीकरणाला गती, आरोग्य विभागाच्या ताफ्यात 200 लसीकरण वाहनं दाखल होणार
कोरोना लसीकरण

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नागपूरमध्ये चालना मिळणार आहे. नागपुरात लसीकरणानं जोर पकडला आहे. आज नागपूर मनपाच्या केंद्रामध्ये कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. राज्य शासनाकडून कोव्हिशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे 18 वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर, “मिशन लसीकरण” अंतर्गत दोनशे वाहनांचे 20 ऑगस्ट रोजी होणार हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे.‘लसीकरण तुमच्या दारी’ मोहीमेअंतर्गत महापारेषणच्या ‘सीएसआर’ निधीमधून 200 वाहनांची खरेदी करण्यात आली असून विदर्भ सहायता सोसायटीनं योगदान दिलं आहे.

शासकीय केंद्रांवर 10 ते 5 पर्यंत लसीकरण

राज्य शासनानं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचा पुरवठा केल्यानं नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केंद्रावर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत होणार आहे.

नि:शुल्क लसीकरण

नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर  सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत होणार आहे. 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोवॅक्सिन लस उपलब्ध

नागपूर महापालिकेला राज्य सरकारनं कोवॅक्सिन लसीचा पुरवठा केल्यानं लसीकरणाला गती मिळणार असून 18वर्षांवरील व 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध झालेला आहे. नागपूर महापालिकेनं पात्र नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, असं म्हटलं आहे.

लसीकरण मोहिमेस मिळणार गती

“मिशन लसीकरण” अंतर्गत दोनशे वाहनांचे 20 ऑगस्ट रोजी होणार हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे.‘लसीकरण तुमच्या दारी’ मोहीमेअंतर्गत महापारेषणच्या ‘सीएसआर’ निधीमधून 200 वाहनांची खरेदी करण्यात आली असून विदर्भ सहायता सोसायटीनं योगदान दिलं आहे.

नागपूर व अमरावती विभागांना मिळणार लसीकरण वाहने

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून नागपूर व अमरावती विभागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी तर्फे सामाजिक दायित्व अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. यातून खरेदी करण्यात आलेल्या  दोनशे लसीकरण वाहनांचे हस्तांतरण शुक्रवार, दिनांक 20 ऑगस्ट रोजी होत आहे.

इतर बातम्या:

VIDEO : बाईकवर तिघं आले, दोघांच्या हातात बंदूक, ज्वेलर्समध्ये शिरताच मोठा गदारोळ, सीसीटीव्हीत थरार कैद

ई-सेवा केंद्र, रेशनकार्डवरुन भाजप आक्रमक, मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरु, तीन आमदारांचा इशारा

Nagpur Municipal Corporation appeal people to take Covishield and Covaxin vaccine jab

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI