‘भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल’, नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर

देशातील अनेक नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून स्तुती करत आहेत. महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो महसूल आहे तो वसूल करत आहे. पण भाजप नेत्यांना त्यांच्या काळात जी वसुली होत होती, त्याची आठवण येत असेल, असा खोचत टोला सत्तार यांनी लगावला आहे.

'भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल', नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर
राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण रामे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आज मुंबईतून सुरुवात झाली. त्यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचं सरकार येईल, असा दावाही राणे यांनी केला आहे. दरम्यान, राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना संकट मोचन हे नावं दिलं गेलं आहे. अनेक संकटं येत आहेत, तरीही ते उत्कृष्ट काम करत आहेत, असा दावा सत्तार यांनी केलाय. (Abdul Sattar responds to Narayan Rane’s criticism of CM Uddhav Thackeray)

देशातील अनेक नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून स्तुती करत आहेत. महाविकास आघाडीवर भाजप नेते वसुलीचा आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकार शासनाचा जो महसूल आहे तो वसूल करत आहे. पण भाजप नेत्यांना त्यांच्या काळात जी वसुली होत होती, त्याची आठवण येत असेल, असा खोचत टोला सत्तार यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवसंपर्क अभियानामुळेच भाजपच्या नेत्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली, असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

दिल्लीच्या सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे त्यामुळे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व्हेमध्ये जनतेशी संवाद कमी झाल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनताच भाजपला धडा शिकवेल, असा टोलाही सत्तार यांनी लगावला आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

हे जनतेचं प्रेम आहे. मला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पंतप्रधान मोदींसाहेबांमुळे हे पद मिळालं. अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे आभार. मंत्रिपद मिळाल्याच्या दीड महिन्यांनी मी महाराष्ट्रात आलो आहे. भाजपकडून आज जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला नतमस्तक झालो. माझ्या खात्याकडून जास्त रोजगार कसे तयार होतील, नोकऱ्या उपलब्ध करणं, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, असं राणे म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

विरोधाबाबत डाव्या उजव्याला बोलायला लावू नये, स्वत: बोलावं. आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. आमची तशी ख्याती आहे. मांजरीसारखं आडवं येऊ नये. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप जिंकणार. 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

इतर बातम्या :

नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार की नाही?, शिवसेनेच्या 2 नेत्यांच्या 2 भूमिका!

‘मातोश्री’च्या अंगणात काट्याची टक्कर, अटीतटीच्या लढतीत हरवलं, आता स्वत: तृप्ती सावंतांकडून नारायण राणेंचं स्वागत!

Abdul Sattar responds to Narayan Rane’s criticism of CM Uddhav Thackeray

Published On - 3:50 pm, Thu, 19 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI