औरंगाबाद : राज्यात शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) दररोज शाब्दिक धुमचक्री सुरु आहे. शिंदे गटातील आमदार, भाजपचे नेते दररोज आपल्या वक्तव्यांनी नवीन वाद ओढावून घेत आहेत. तर विरोधकही हल्लाबोल करायला चूकत नसल्याचे चित्र आहे. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गनिमी कावा केल्याचा युक्तीवाद करण्यात येत आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सडकून टीका केली आहे. ‘गनिमी कावा कसला, ही तर गद्दारीच!’, असल्याचा पलटवार दानवे यांनी केला आहे.