AMC Election 2022 Ward 15 | अकोल्यात भाजपचा गड मजबूत, काँग्रेस राष्ट्रवादी, सेनाला लवाता येईल का सुरुंग

AMC Election 2022 Ward 15 | पश्चिम विदर्भात भाजपने पक्ष संघटना मजबूत करणाऱ्यावर गेल्या पाच वर्षात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे.

AMC Election 2022 Ward 15 | अकोल्यात भाजपचा गड मजबूत, काँग्रेस राष्ट्रवादी, सेनाला लवाता येईल का सुरुंग
भाजपच्या गडाला कोण लावणार सुरुंग?Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 7:07 AM

AMC Election 2022 Ward 15 | पश्चिम विदर्भात(Western Vidarbha) भाजपने (BJP)पक्ष संघटना मजबूत करणाऱ्यावर गेल्या पाच वर्षात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. अकोला हे सर्वच चळवळींचे केंद्र ठरलं आहे. भाजप आणि संघाच्या मुशीत तयार होणाऱ्या या शहरात वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) प्रयोग ही यशस्वी ठरला आहे. पण अमरावती आणि अकोला जिल्ह्यावर भाजपने विशेष लक्ष दिले आहे. अमरावतीत खा. डॉ.अनिल बोंडे, आ. श्रीकांत भारतीय, तर अकोल्यात खा. संजय धोत्रे, बुलडाण्यात डॉ. संजय कुटे यांच्या रुपाने नवीन सत्ता समीकरण राबविण्याचा भाजपचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. तसा हा पट्टा संघाच्या ही मुशीतील आहे. संघाशी संबंधित राज्यातील सर्वात मजबूत आणि मोठ्या सहकारी बँका याच बुलडाणा, खामगाव आणि अकोला पट्यातील आहेत. सोबतच शैक्षणिक संस्थांचे ही मोठे जाळे आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीची (AMC Election 2022) तयारी भाजपने सर्वांच्या अगोदर सुरु केली आहे. अनेक जणांना भाजपच्या आक्रमक शैलीने भूरळ घातली आहे.

आतापर्यंत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असा महापालिकेचा प्रवास राहिलेला आहे. 2017 मध्ये भाजपने मिशन अकोला महापालिका राबविले. लोट्स ऑपरेशनद्वारे भाजपने महापालिकेत इतिहास घडवला. महापालिका निवडणुकीत 80 पैकी तब्बल 48 जागांवर भाजपने मुसंडी मारली. एकहाती अकोला महापालिकेची सत्ता मिळवली. सध्या भाजपसह काँग्रेसला गटातटाच्या राजकारणाने ग्रासले आहेत. या पक्षांची अंतर्गत शकल पडली आहेत. त्याचा फायदा नव्या जोमातील शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला मिळू शकते. दलित, मुस्लीम आणि बहुजन वस्तीत भाजपपुढे काँग्रेससह वंचितचे ही तगडे आव्हान राहणार आहे.

महापालिकेतील लोकसंख्येचे गणित

अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता आहे. वॉर्ड क्रमांक 15 मध्ये एकूण 17,451 लोकसंख्या आहे. त्यात 382 अनुसूचित जातीचे तर 73 अनुसूचित जमातीचे लोक आहेत.

वॉर्ड क्रमांक 15 मध्ये कोणता परिसर

या प्रभागात काळामारोती मंदिर परिसर, अगरवेस, जयहिंद चौक, गणपती गल्ली, मुंगसाजी महाराज मंदिर परिसर, शिवाजीनगर, शिवचरणपेठ, खिडकी पुरा, कोमटीपुरा असा परिसर येतो.

गेल्या वेळी निवडून आलेले नगरसेवक

वॉर्ड क्रमांक 15 अ शारदा खेडकर भाजप वॉर्ड क्रमांक 15 ब मनिषा भंसाली भाजप वॉर्ड क्रमांक 15 क बाळ टाले भाजप वॉर्ड क्रमांक 15 ड दीप मनवाणी भाजप

पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
वंचित बहुजन आघाडी
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
वंचित बहुजन आघाडी
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
वंचित बहुजन आघाडी
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
इतर

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.