Amit Deshmukh : अमित देशमुख यांच्या कामचुकार कारभाराने कलावंतांचे मोठे नुकसान, राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांची सडकून टीका

या खात्याला मिळालेल्या अमित देशमुखांसारख्या (Amit Deshmukh) अ रसिक व अकार्यक्षम मंत्र्यामुळे कलावंत चे खूप मोठे नुकसान झाले, अशी टीका राष्ट्रावादीकडून करण्यात आलीय.

Amit Deshmukh : अमित देशमुख यांच्या कामचुकार कारभाराने कलावंतांचे मोठे नुकसान, राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांची सडकून टीका
अमित देशमुख यांच्या कामचुकार कारभाराने कलावंतांचे मोठे नुकसान, राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांची सडकून टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 8:24 PM

मुंंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारने (Mahavikas Aghadi) अडीच वर्षे राज्याचा कारभार पाहिला, या सरकारने अनेक चांगले व लोक हीताचे निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात अनेक प्रकल्प मार्गे लागलेत. मात्र गेल्या अडीच वर्षात सांस्कृतिक खातं (Cultural) मात्र निष्क्रिय होत. कारण या खात्याला मिळालेल्या अमित देशमुखांसारख्या (Amit Deshmukh) अ रसिक व अकार्यक्षम मंत्र्यामुळे कलावंत चे खूप मोठे नुकसान झाले, अशी टीका राष्ट्रावादीकडून करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील हे सतत माजी उपमुख्यमंत्री अजित दादा व खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत लोक कलावंताच्या प्रश्न असो किंवा मराठी चित्रपटला उद्योगाचा दर्जा देण्यासाठीची धडपड असो किंवा वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवून देण्याचे प्रक्रिया असो, मुंबईमध्ये कलाकार भवन उभे करावे, लोक कलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासाठीचा सतत पाठपुरावा करत राहिलेत, असेही सांगण्यात आलंय.

अमित देशमुखांमुळे योजना रखडल्या-पाटील

तर यासाठी अजित दादा आणि सुप्रियाताईंनी देखील सतत अमित देशमुख यांना भेटून विविध निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केले तरीपण अमित देशमुख यांनी कुठलेही कलावंतहिताचे निर्णय न घेतल्यामुळे गेल्या अडीच वर्षात अनेक कलावंतांना विविध उपयोजनांपासून वंचित राहावे लागले. करोना काळामध्ये 56 हजार कलाकारांना त्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन देखील फेल गेले,प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचा आणलेला मुद्दा वृद्ध कलावंतांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव,तसेच मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भात निर्णय अजितदादा यांनी तत्काळ मार्गी पण लावला होता. मात्र अमित देशमुख यांच्या कार्यालयाकडे कलावंताच्या मानधन वाढीचा प्रस्ताव ,मराठी चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव पडून राहिल्यामुळे शेवटी सरकार गेल तरीही अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही, अशी टीकाही बाबासाहेब पाटील यांच्याकडून करण्यात आलीय.

एकाही अधिवेशनात चर्चा नाही

यातील वरील सर्व मागण्या त्यांचा सतत पाठपुरावा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सतत माझी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचा पाठपुरावा करून देखील त्यांनी अडीच वर्षात एकदाही ना तो मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये घेतला, ना अडीच वर्षात एवढी अधिवेशन झाली ना त्याच्यामध्ये एकदाही या संदर्भात चर्चा देखील केली नाही, त्यामुळे खरंच माझी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच कलाकारांचे खूप मोठे नुकसान झाले असे खेदजनक आम्हाला बोलावेसे वाटते, असेही पाटील म्हणाले आहेत.

किमान आता तरी न्याय मिळावा

राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्यशैलीमध्ये आणि अमित देशमुख यांच्या कार्य शैलीमध्ये जमीन आसमानाचा फरक या ठिकाणी दिसून येतो ,अनेक काही जुने मोठे कलाकार स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे अनेक वेळा संस्कृतिक कामाबद्दल कामाच्या पावत्या व स्तुती करताना दिसले, त्याच बरोबर उलट अमित देशमुख यांना अगदी मोठ्या प्रमाणावर नाव ठेवताना महाराष्ट्रातील कलाकार या ठिकाणी दिसला, त्यामुळे आतातरी शिंदे सरकार सांस्कृतिक विभागाला रसिक व सांस्कृतिक जाण असलेल्या मंत्री देतील अशी अपेक्षित आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.