युतीचं नंतर बघू, सर्व जागा लढवण्यास तयार राहा, अमित शाहांचे आदेश

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कुठलीही चर्चा न करता, थेट भाजपने सर्व जागांवर लढण्याची तयारी करावी, असा आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील खासदारांना दिला. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांचा लोकसभेमधील आणि लोकसभा क्षेत्रातील आढावा घेतला. खासदारांनी आपल्या …

युतीचं नंतर बघू, सर्व जागा लढवण्यास तयार राहा, अमित शाहांचे आदेश

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कुठलीही चर्चा न करता, थेट भाजपने सर्व जागांवर लढण्याची तयारी करावी, असा आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील खासदारांना दिला.

या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांचा लोकसभेमधील आणि लोकसभा क्षेत्रातील आढावा घेतला. खासदारांनी आपल्या मतदारसंघातील कामगिरीविषयी माहिती दिली, सोबतच मतदारसंघातील अडचणींबाबत सूचनाही केल्या. यावेळी अमित शाहांनी युतीबाबत विचार करु नका सर्व जागांवर लढण्याची तयारी ठेवा, अशा सूचना दिल्या.

दरम्यान, युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. तर युतीबाबत महाराष्ट्रातच चर्चा होईल, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेच्या युती बाबतची चर्चा होईल, असं सावंत म्हणाले.

दुसरीकडे  महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती झाली, तरी काँग्रेसला कुठलाही फरक पडणार नाही, असे मत काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारणात अनेक फेरबदल होणार हे निश्चित आहे. भाजप- शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यामधील युती-आघाडीच्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे भवितव्य ठरेल.

संबंधित बातम्या 

परफॉर्मन्स द्या, अन्यथा तिकीट नाही, अमित शाहांचा खासदारांना इशारा  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *