मुख्यमंत्री शिंदे यांचा मंत्रालयातील प्रवेश, राष्ट्रपतींच्या शपथविधीपूर्वीच्या मंत्रोच्चारावर मिटकरींचा आक्षेप; सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Jul 27, 2022 | 6:37 PM

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यांच्यापुढे आदिवासी ही जात लावली. पण शपथ घेण्याच्या आधी मंत्रोच्चार गेला, असा दावा करत मिटकरी यांनी कार्यक्रमात एक ऑडिओ क्लिपही वाजवून दाखवली.

मुख्यमंत्री शिंदे यांचा मंत्रालयातील प्रवेश, राष्ट्रपतींच्या शपथविधीपूर्वीच्या मंत्रोच्चारावर मिटकरींचा आक्षेप; सरकारवर हल्लाबोल
अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: Google
Follow us on

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या दिवशी मंत्रालयात गेले त्या दिवशी तिथे पूजाविधी करण्यात आला. उद्या मुस्लिम मुख्यमंत्री झाला तर तो म्हणेल मी नमाज पडतो, बौद्ध गेला तर तो म्हणेल मी बुद्ध वंदना म्हणतो, जर तुम्ही राजकारणात असाल तर राष्ट्रधर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे. आमचं रक्त काढलं तर त्यातून फुले, शाहू, आंबेडकर बाहेर येतील, अशा शब्दात मिटकरी यांनी शिंदेंवर हल्ला चढवला. इतकंच नाही. तर द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यांच्यापुढे आदिवासी ही जात लावली. पण शपथ घेण्याच्या आधी मंत्रोच्चार गेला, असा दावा करत मिटकरी यांनी कार्यक्रमात एक ऑडिओ क्लिपही वाजवून दाखवली.

अशोक स्तंभावरील सिंहांच्या जबड्यावरुनही सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरुन अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. शिल्पकार देवसे यांनी कुठल्या शिल्पाचा अभ्यास केला माहिती नाही. सिंहाचे जबडे बंद होते. पण या सिंहांचे जबडे उघडे आहेत. पण सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी सांगितले अशोक स्तंभावरील सिंह संविधानाला धरुन नाहीत, असंही मिटकरी म्हणाले. तसंच सरन्यायाधीश रमन्ना यांच्या निवृत्तीचे 2 महिने राहिले आहेत, तोपर्यंत काही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, असा टोलाही मिटकरींनी शिंदे सरकारला लगावलाय.

‘पुरंदरे इतका खोटा इतिहास कुणी लिहिला नाही’

राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंचं समर्थन केलं. पण बाबा पुरंदरे इतका खोटा इतिहास कुणी लिहिला नाही, असा आरोप मिटकरी यांनी केलाय. तसंच रवी राणा यांच्या हनुमान चालिसा घेऊन फिरण्यावरुनही मिटकरींनी टोला हाणलाय. शाहू महाराज हे मल्लखांब, कुस्तीवाले होते. ते योगा, प्राणायामवाले नव्हते. भीमा कोरेगावची दंगल भडकवणाऱ्या माकडासारखं शरीर नव्हतं शाहू महाराजांचं, अशा शब्दात मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांना लगावलाय.

‘हे सरकार औटघटकेचं ठरेल’

महाराष्ट्र सध्या संकटात आहे. मंत्रिमंडळ नसल्यामुळे महाराष्ट्रात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही हे सरकार बेकायदेशीर सरकार आहे. न्यायमूर्ती रमन्ना हे लवकर निर्णय घेतील आणि सरकार पडणार आहे. हे सरकार औटघटकेचं सरकार ठरेल, असा दावाही मिटकरींनी केलाय. तसंच बंडखोर आमदारांनी दिलेल्या शुभेच्छा काही मनातून दिलेल्या नाहीत. त्यांनी कशाही शुभेच्छा दिल्या तरी त्याला काही महत्व नाही, असंही ते म्हणाले.