छुपाएं कुछ छुपता नहीं, सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांकडून आणखी एक ट्विट

सच को सीने से लगाया करते हैं !" ही शायरी अमृता फडणवीस यांनी ट्विट केली (Amruta fadnavis tweet on Sushant Death Case) आहे.

छुपाएं कुछ छुपता नहीं, सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांकडून आणखी एक ट्विट

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (Amruta fadnavis tweet on Sushant Death Case)

अमृता फडणवीस यांनी एक शायरी ट्विटरवर पोस्ट केली आहे. “रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं ! मगर हम तो वो शक़्स हैं, जो पत्थरों से घर बनाया करते हैं ! भूल गए हैं वो कांच के घरो में रहकर ख़ुद, छुपाएं कुछ छुपता नहीं ! हम फरेबियोंको ठोकरों में,और सच को सीने से लगाया करते हैं !” ही शायरी अमृता फडणवीस यांनी ट्विट केली आहे. यासोबतच त्यांनी JaiShreeRam, JusticeForSushant, Disha असे तीन हॅशटॅगही वापरले आहेत. 

अमृता फडणवीसांचा मुंबई पोलिसांवर निशाणा

“बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

““मुंबई सुरक्षित आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जनतेला उत्तर हवं आहे. अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे सुशांत सिंह राजपूत यांच्याविषयी आहे. या ट्विटचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये”, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केलं होतं.

याच ट्विटला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. युवासेनेचे सरचिटणीस वरुन सरदेसाई, त्यानंतर शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. (Amruta fadnavis tweet on Sushant Death Case)

संबंधित बातम्या : 

कारसेवा करताना खांद्यावरुन गोळ्या जाताना पाहिलं, तुरुंगवासही भोगला : देवेंद्र फडणवीस

असुरक्षित वाटत असेल तर फडणवीसांनी राज्य सोडणे हाच उपाय : शिवसेना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *