भरोसा नसेल तर पोलिस सिक्युरिटी सोडा, वरुण सरदेसाईंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबईत जगणे सुरक्षित वाटत नाही, अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले.

भरोसा नसेल तर पोलिस सिक्युरिटी सोडा, वरुण सरदेसाईंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा ट्विटर वॉर रंगला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचे प्रकरण हाताळण्यावरुन मिसेस फडणवीसांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता निशाणा साधला. त्यावर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं. (Varun Sardesai answers Amruta Fadnavis criticism on Mumbai Police)

“बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले.

युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी मिसेस फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. “मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!” अशा शब्दात सरदेसाई यांनी आव्हान दिलं.

याआधी, “ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर शिवसेना आणि मिसेस फडणवीस यांच्यात ट्वीटयुद्ध रंगले होते.

संबंधित बातम्या :

‘नशीब, मुख्यमंत्री स्वतःचं गुणगान ‘गात’ नाहीत’, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं उत्तर

आधी आदित्य ठाकरेंचा ‘रेशीम कीडा’ उल्लेख, आता रश्मी ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात….

(Varun Sardesai answers Amruta Fadnavis criticism on Mumbai Police)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI