ठरलं ! विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर, 8 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान होणार असल्याची माहिती दिली.

मुंबई: संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च ते 10 मार्च दरम्यान होणार असल्याची माहिती दिली. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होणार आहे. (Anil Parab said budget session of Maharashtra legislature will commence from March 1)

कसं असेल राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

1 मार्च : राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. 2020-21 च्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्या जातील. तर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील.

2 मा्र्च : या दिवशी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचं शासकीय नियमाप्रमाणं कामकाज होईल. तर राज्यपालांच्या अभिभाषणावर पहिल्याद दिवसाची चर्चा सुरु होईल.

3 मार्च : या दिवशी दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल. या दिवशी अभिभाषणावरील चर्चा संपेल.

4 मार्च: दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे.

5 मार्च : दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे. तर पुरवणी विनियोजन विधेयक मांडले जाईल.

6 आणि 7 मार्चला विधिमंडळाला सुट्टी राहील

8 मार्चला अर्थसंकल्प

8 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु होईल. सन 2021-22 चा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात सादर केला जाईल.

9 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु राहील.

10 मार्च : दोन्ही सभागृहांचे शासकीय कामकाज सुरु होईल. अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा केली जाईल. यादिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे.

दरम्यान, सरकार अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक करतंय. वाढीव वीज बिल प्रश्नी आणि संजय राठोडप्रश्नी उघडं पडण्याची भीती असल्यानं सरकारला अधिवेशनातून पळ काढायचाय, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

संबंधित बातम्या :

‘मंत्री 10 हजार लोकं जमवतो आणि अधिवेशनाला मात्र कोरोना कोरोना’, फडणवीसांकडून ठाकरे सरकारची खिल्ली

LIVE | आठ तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यावर दोन दिवस चर्चा- अनिल परब 

(Anil Parab said budget session of Maharashtra legislature will commence from March 1)

Published On - 6:48 pm, Thu, 25 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI