LIVE | रायगड जिल्ह्यात कोरोनाचे नवे 75 रुग्ण आढळले, एकूण 1705 जणांचा मृत्यू

| Updated on: Mar 24, 2021 | 7:09 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | रायगड जिल्ह्यात कोरोनाचे नवे 75 रुग्ण आढळले, एकूण 1705 जणांचा मृत्यू
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Feb 2021 09:46 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात कोरोनाचे नवे 75 रुग्ण आढळले, एकूण 1705 जणांचा मृत्यू

    रायगड : आज नवीन रुग्ण 75 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

    सर्वाधिक रुग्ण पनवेल तालुक्यात आढळली असून रुग्णांची संख्या 46 वर पोहोचली आहे.

    येथे आतापर्यंत 61093 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर रायगडमध्ये आतापर्यंत एकूण 1705 जणांचा मृत्यू झालेला आहे.

  • 25 Feb 2021 08:44 PM (IST)

    अकोल्यात दिवसभरात 279 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    अकोला : आज दिवसभरात 279 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत

    सकाळी 167 आणि संध्याकाळी 112 असे एकूण 279 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

    ऐकून कोरोनाबाधितांचा आकडा 15124 झाला आहे

    आज दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे

    कोरोनामुळे आतापर्यंत 362 जणांचा मृत्यू

    तर 11841 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    उपचार घेत असलेले रुग्ण 2921 आहेत

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती

  • 25 Feb 2021 08:26 PM (IST)

    'ही फक्त झलक', अंबानींच्या घरासमोर आढळलेल्या स्कॉर्पिओमधील पत्रात उल्लेख, जिलेटीनच्या कांड्याही सापडल्या

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या संशयित स्कॉर्पिओमध्ये एक पत्र आणि जिलेटीनच्या कांड्या आढळल्या आहेत. गाडीतील या पत्रात 'ही फक्त झलक' अल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या प्रकारामागे नेमकं कोण आहे, याबद्दल कसलाही उल्लेख या पत्रात करण्यात आलेला नाही. या घटनेची जबाबदारी अजून कोणीही स्वीकारलेली नाही.

  • 25 Feb 2021 08:16 PM (IST)

    अंबानींच्या घरासमोरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या,चौकशी सुरु, लवकरच सत्य समोर येईल- अनिल देशमुख

    मुंबई येथील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या सांपडल्या आहेत

    या घटनेची सर्व चौकशी करण्यात येणार आहे.

    या घटनेचा पुढील तपास मुंबईच्या गुन्हे शाखेकडे दिला आहे. लवकरच सत्य समोर येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

  • 25 Feb 2021 07:57 PM (IST)

    मुंबईत पोलीस यंत्रणा कामाला लागली, सुरक्षा वाढवली

    मुकेश अंबानी यांच्या घरासमोर संशयित स्कॉर्पिओ गाडी आढल्यानंतर तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन पथक येथे पोहोचले.

    सध्या थोड्या प्रमाणात परिस्थिती निवळली आहे.

    दरम्यान, नरिमन भागातील मुकेश अंबानी यांच्या कार्यलयात एक पत्र आल्याचीही माहिती समोर आली आले.

    सध्या परिस्थिती निवळताना दिसतेय.

    साधारण 4 वाजल्यापासून ही गाडी अंबानी  यांच्या घरासमोर असल्याचे दिसत आहे.

    सध्या अंबानी यांच्या घरासमोरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

    अंबानी यांच्या घरासमोर असलेल्या गाडीचा नंबरही बनावट असल्याचं समोर आलं आहे.

    या प्रकाराचा सर्व तपास विश्वास नागरे पाटील करत आहेत.

    मुंबई पोलिसांनी या प्रकाराबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा प्रसिद्धीपत्रक दिलेले नाही.

    मुकेश अंबानी  यांचे कुटुंबीय सध्या त्यांच्या बंगल्यामध्ये उपस्थित आहेत.

    याच बंगल्यासमोर संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळली आहे.

  • 25 Feb 2021 07:52 PM (IST)

    सर्व गोष्टींचा तपास सुरु आहे, संशयित गाडीबद्दल अधिक बोलणं योग्य होणार नाही- शंभूराज देसाई

    मुकेश अंबानी यांच्या घरासमोर संशयित कार मिळाल्याचे समजले

    ती गाडी ताब्यात घेतली आहे. त्या गाडीवरचा नंबर मिटवण्यात आला आहे.

    मी स्व:त मुंबई पोलीस आयुक्तांशी बोललो आहे.

    कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. पोलीस या प्रकाराच्या खोलात जातील.

    यामागे कोण आहे, याचा तपास केला जाईल.

    या प्रकाराचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला आहे.

    त्या गाडीमध्ये जिलेटीन असल्याची शक्यता आहे.

    पण पूर्ण माहिती समोर आल्याशिवाय याबाबत बोलणे उचित होणार नाही.

    आम्ही मुंबईच्या सुरक्षेसाठी सतत अलर्ट असतो.

    आम्ही अधिक कडक उपायोजना करु

    या प्रकारामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही.

    जेवढे गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहायचे आहे, त्याकडे पाहतो आहोत.

    या प्रकरणामुळे सर्व यंत्रणांना, तसेच पोलिसांना सर्व  खबरदारी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 25 Feb 2021 07:44 PM (IST)

    अंबानी यांच्या घराजवळ संशयित स्कॉर्पिओ, घातपाताचा संशय

    मुकेश अंबानी यांच्या घराजवल संशयित स्कॉर्पिओ आढळली आहे.

    पोलीस सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार या गाडीमध्ये एक जिलेटीनची रॉड आढळली आहे.

    तसेच या गाडीमध्ये आणखी काही आहे का याची तपासणी सुरुआहे.

    हा परिसर अत्यंत व्हिआयपी आहे. या ठिकाणी गाडी आढळल्यामुळे यामागे काही घातपात करण्याची शक्यता आहे का, याची तपासणी सुरु आहे.

    हा रस्ता अत्यांत व्हीआयपी असल्यामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे ही घटना लगेच उघडकीस आली.

    नक्की गाडीमध्ये काय काय आहे, याचा खुलासा झाला नाही.

    मुकेश अंबानी यांना मोठी सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. मात्र , असे असून सुद्धा ही संशयित गाडी आढल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत.

  • 25 Feb 2021 07:31 PM (IST)

    प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित कार: पोलीस, एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल

    मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित कार

    स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय

    मुंबई पोलीस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल

    सहआयुक्त विश्वास नागरे पाटीलही घटनास्थळी

    मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

    या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपासणी केली जातीय

  • 25 Feb 2021 07:06 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं थैमान वाढलं, दिवसभरात तब्बल 601 जण कोरोना पॉझिटिव्ह

    - नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं थैमान वाढलं

    - जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 601 जण कोरोना पॉझिटिव्ह

    - नाशिक शहर - 366, नाशिक ग्रामीण 162, मालेगाव 53 रुग्ण

    -  उपचारादरम्यान दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू

    - जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या गेली 2095 वर

    - जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली.

  • 25 Feb 2021 07:04 PM (IST)

    बांधकाम चालू असतूना सिमेंट मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

    रत्नागिरी : सिमेंट मिक्सरमध्ये पडून 28 वर्षाच्या कामगाराचा जागीच मृत्यू.

    चिपळूणमधील पेढांबे येथील घटना.

    सिमेंट मिक्सरमध्ये अडकलेला कचरा काढण्याचा प्रयत्न करताना गेला तोल.

    मृत झालेला कामगार गुहागर विजापूर मार्गाचे काम करणाऱ्या मनीषा कन्स्ट्रक्शनचा असल्याची माहिती.

  • 25 Feb 2021 06:41 PM (IST)

    संजय राठोड यांच्याविरोधात भाजपची पुण्यात तक्रार, गुन्हा दाखल होणार का?

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजपनं वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार भाजप युवा मोर्चातर्फे दाखल करण्यात आली आहे. या तक्ररीत पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा उल्लेख आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ही पहिलीच तक्रार असून तिही भाजपने केली आहे. त्यामुळे आता याबाबत गुन्हा दाखल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 25 Feb 2021 05:40 PM (IST)

    आठ तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यावर दोन दिवस चर्चा- अनिल परब 

    आठ तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडले जाईल.

    त्यावर दोन दिवस चर्चा होईल. त्यांनतर विनियोजन बील पास होईल.

    विरोधकांच्या वॉकआऊटला अधिकृत बहिष्कार म्हणता येणार नाही . ते बाहेर जाण्याआधीच बैठक संपली होती.

    अधिवेशनाला घाबरलो असतो तर चार आठवड्या दिला होता. मात्र, कोरोनामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला.

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तपास सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यांतर याबाबत कारवाई होईल.

    दोषींवर कारवाई होणार, हे याआधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे.

  • 25 Feb 2021 05:33 PM (IST)

    पूजा चव्हाणच्या प्रकरणात चौकशी होण्याची भीती म्हणून सरकारचा अधिवेशनातून पळ- प्रविण दरेकर

    सध्या कोरोनावर चर्चा होणे अपेक्षित आहे.

    मात्र सरकार अधिवेशनातून पळ काढत आहे.

    देशभरात सध्या अधिवेशन सुरु आहे.

    कोरोनाची काळजी घेता येते. मात्र पूजा चव्हाणच्या प्रकरणात चौकशी होईल म्हणून सरकार पळ काढत आहे.

    पूजा चव्हाण हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

    हत्या होते. पण एफआरआय दाखल होत नाही

    वेगवेगळे फोटो आहेत, क्लिप आहे. मात्र अजूनही कारवाई होत नाहीये

    संजय राठोड यांच्या कृत्यावर शरद पवार नाराज नाहीत

    ते पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीविषयी नाराज आहेत.

    या प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसेल तर पोलीस राज्य सरकाच्या दबावाखाली राहून कारवाई करत नाहीत असं दिसतंय

    चित्रा वाघ यांना धमक्या येत आहेत. पूजा चव्हाण प्रकरणाचा छडा लागला पाहिजे.

  • 25 Feb 2021 05:06 PM (IST)

    सरकारला कामकाज करायचंच नाही, आम्ही प्रश्न मांडायचे कुठे?- फडणवीस

    या सरकारला अधिवेशन करायचंच नव्हतं.

    सरकारला कामकाज करायचंच नाही, आम्ही प्रश्न मांडायचे कुठे?- फडणवीस

    सगळ्या मंत्र्यांचे कार्यक्रम चालू आहेत आणि अधिवेशनाला मात्र कोरोना कोरोना म्हणतायत

    कोरोनाच्या नावावर अधिवेशनापासून पळ काढाल जात आहे.

    सरकारकडे जनतेच्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत.

    इथं कोरोना म्हणता, आणि मंत्र्यांसोबत दहा हजार लोकं आहेत

    सरकारकडून अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न

    विरोधक  वीजबिल वाढ, संजय राठोड प्रकरणावर आक्रमक होणार हे सरकारला माहीत होते. त्यामुळे सरकारने अधिवेशनातून पळ काढला.

    कोरोनाच्या नावाखाली अधिवेशनाचा काळ कमी करायचा आहे.

    जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणेघेणे नाही.

    अधिवेशनात जो कालावधी मिळेत त्या कालावधीत आम्ही आमचे आयुधं वापरुन सरकारला उत्तरं जनतेच्या प्रश्नांवर उत्तरं द्यायला भाग पाडू.

    सरकार आपलेच मंत्री आणि आमदारांना घाबरलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा विषय या अधिवेशनात अजेंड्यावरच नाही.

  • 25 Feb 2021 04:53 PM (IST)

    नवी मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमांत फक्त 50 माणसांना परवानगी, अन्यथा 50 हजारांचा दंड

    नवी मुंबईमध्ये लग्न आणि इतर समारंभासाठी कडक नियम

    कोरोना संसर्गाच्या वाढत असल्यामुळे आयुक्तांनी घेतला निर्णय

    लग्न समारंभ किंवा इतर समारंभात फक्त 50 माणसांना परवानगी

    समारंभात कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश

    50 पेक्षा जास्त व्यक्ती सापडल्यास मंगल कार्यालय, खुले लॉन्स तसेच कार्यक्रम करणारे यांच्याकडून वसूल करणार 50 हजार रुपये दंड

    तसेच आयोजकांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल

  • 25 Feb 2021 04:48 PM (IST)

    चंद्रपूरमध्ये बांबू संशोधन प्रकल्पाला भीषण आग, कारण अस्पष्ट

    चंद्रपूर : शहरालगत वनविभागाच्या महत्वाकांक्षी बांबू संशोधन प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. चिचपल्ली गावाजवळ ही आग लागली आहे. हे जागतिक दर्जाचे निर्माणाधीन बांबू संशोधन केंद्र असून, सर्वात आधी प्रकल्पाच्या छतावर आग दिसून आली. त्यानंतर संपूर्ण छताला आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही.

  • 25 Feb 2021 04:44 PM (IST)

    नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने दिली मान्यता

    लंडनः पंजाब नॅशनल बँकेतील 14,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार हिरा व्यावसायिक नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली. नीरव मोदीविरोधात भारतात एक खटला चालू आहे, ज्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, असंही लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितलं. नीरव मोदी यांच्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना धमकावण्याचा कट रचणे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत.

  • 25 Feb 2021 01:45 PM (IST)

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आत्महत्येचे, गुन्हा मानूनच तपास सुरु : पोलीस महासंचालक

    पूजा चव्हाण अॅक्सिडेन्टल डेथ केस आहे, पण यातही गुन्ह्यासारखा आपण तपास करतो. पुणे पोलीस तो तपास करत आहेत. पोहरादेवी गर्दीबाबत सत्य तपासात येईल तेव्हा कारवाई होईल. पूजा चव्हाण किंवा कुठल्याही तपासाबद्दल मीडियात सांगणे योग्य नाही, सुरु असलेल्या तपासाबाबत माहिती देणे म्हणजे त्याबाबत चुकीचा समज पसरवणे आहे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याबाबात झालेलं योग्य नाही, असं पोलीस महासंचालक हेमंत नगराळे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.

    आज मी नागपूर शहर आणि नागपूर परिक्षेत्राचा आढावा घेत आहे. ऑन ड्युटी मृत्यू झालेल्या पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागपूर गुन्हेगारी नियंत्रणात आहे.. आमच्या उपयोजना सुरू आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलीस तपास योग्य दिशेने आहे

    आज पुण्यात काय घडले मला ते माहीत नाही, मात्र प्रत्येक नागरिकाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.. राजकीय दबाव आहे का या प्रश्नावर नगराळे म्हणाले, मी असे कोणतेही भाष्य करणार नाही, ज्याच्यावरून तुम्ही अर्थ काढावे..

    पोलिसांचे तपास तथ्यावर चालतो, असे झाले तर तसे झाले तर अशा जर तर वर पोलीस तपास चालत नाही.. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आत्महत्येचे आहे.. पोलीस अशा आत्महत्येचा तपास गुन्हा मानून करतो.. तशाच पद्धतीने पुणे पोलीस तपास करत आहेत - हेमंत नगराळे

  • 25 Feb 2021 12:05 PM (IST)

    संजय राठोडला वाचवण्यासाठी पोलीस काहीही करत नाहीत, मंत्री जास्त महत्त्वाचा - चित्रा वाघ

    आई वडील म्हणतात तक्रार नाही, भाऊ-आजी म्हणते आमची मुलगी आत्महत्या करणारी नव्हती आणि ते खरंय, त्याची काही किंमत नाही, सर्व पुरावे आहेत, तरीही पोलीस काहीही करत नाहीत, संजय राठोडला वाचवण्यासाठी, मंत्री जास्त महत्त्वाचा, गोर गरिबांच्या पोरी मेल्या तरी चालतील, हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही

  • 25 Feb 2021 12:01 PM (IST)

    तो संजय राठोड यांचाच आवाज - चित्रा वाघ

    पंचनामा झाला, वस्तू सापडल्या असतील, तिचा लॅपटॉप पोलिसांकडे असेल, रोज बातम्या येत आहेत की पुजाच्या लॅपटॉपमधून धक्कादायक खुलासे, गौप्यस्फोट, मग पुणे पोलीस व्हिडीओ आणि फोटो फिरवत आहेत का?, पोलीस अजूनही अॅक्शन मोडमध्ये का येत नाहीये, महत्त्वाचं म्हणजे सुमोटोमध्ये गुन्हा दाखल का करत नाही, त्या १२ ऑडियो क्लिपचं काय झालं, तो आवाज कुणाचा, मी म्हणते तो संजय राठोडचा आवाज आहे, 100 टक्के त्यांचाच आवाज आहे, पोलीस कोणाच्या आदेशाचे वाट बघतायत

  • 25 Feb 2021 11:57 AM (IST)

    इतके भयानक योगायोग मी कधीही पाहिले नाही - चित्रा वाघ

    त्या डॉक्टरचं नक्की काय झालं आणि बरेबर दुसऱ्याच दिवशी डॉक्टरची आई आजारी पडावी, त्यामुळे ते आठ दिवस रजेवर जावे, लगेच दोन दिवसांनी अरुण राठोडच्या घरावर दरोडा पडावा, चोरी व्हावी, म्हणजे इतके भयानक योगायोग मी कधीही पाहिले नाही, कोणाला वाचवताय?

  • 25 Feb 2021 11:54 AM (IST)

    यवतमाळच्या एसपींना सुद्धा इतक्या मोठ्या घटनेबाबत पुणे पोलिसांनी सांगितलं नाही - चित्रा वाघ

    यवतमाळला ज्या ठिकाणी गर्भपातासाठी पुजा गेली अशी बातमी आहे, त्यासंदर्भात मी आज यवतमाळच्या एसपींसोबत बोलली, त्या दिवशी रुग्णालयाच जे डॉक्टर होते त्यांनी पुजाला ट्रीटमेंट दिली नाही, दुसऱ्या डॉक्टरने येऊन पुजाला ट्रीटमेंट दिली, मग त्या डॉक्टरची चौकशी केली का?, एसपींनी सांगितलं की पुण्याची टीम इथे तपासासाठी आली होती, त्यांनी आमच्याकडे कुठलीही विचारणा किंवा मदत मागितली नाही, त्यांची टीम आली आणि तपास करुन गेली, यवतमाळच्या एसपींना सुद्धा इतक्या मोठ्या घटनेबाबत पुणे पोलिसांनी सांगितलं नाही,

  • 25 Feb 2021 11:49 AM (IST)

    100 नंबरला गेलेला कॉल पोलिसांनी सार्वजनिक करावा - चित्रा वाघ

    100 ला केले गेलेले कॉल रेकॉर्ड होतात, त्यामुळे त्या दिवशी सकाळी 100 नंबरला गेलेला कॉल पोलिसांनी सार्वजनिक करावा, या प्रकरणात इंतभूत माहिती देऊनही पोलिसांनी काहीच अॅक्शन का घेतली नाही?,

  • 25 Feb 2021 11:41 AM (IST)

    राठोड यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं : चित्रा वाघ

    राज्यात महिला आयोगाला अध्यक्षच नाही, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, संजय राठोड यांची चौकशीच नाही, मग अहवाल कुठला पाठवला? राठोड यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं : चित्रा वाघ

  • 25 Feb 2021 11:41 AM (IST)

    दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, हे बारा व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये आहे : चित्रा वाघ

    दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, हे बारा व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये आहे, पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या अरुण राठोडच्या मोबाईलवर हा फोन, त्यावेळी संजय राठोड फोनवर होते : चित्रा वाघ

  • 25 Feb 2021 11:38 AM (IST)

    सिनिअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे, हे आम्ही शोधून काढू : चित्रा वाघ

    सिनिअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे, हे आम्ही शोधून काढू, विधीमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरु : चित्रा वाघ

  • 25 Feb 2021 11:36 AM (IST)

    पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी दोघांची चौकशीही पोलिसांनी केली नाही - चित्रा वाघ

    पूजा चव्हाणसोबत राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी दोघांची चौकशीही पोलिसांनी केली नाही, की त्यांना सोडून द्यायचं ठरलं होतं? त्यांच्या घरांना टाळं लागल्याचं मीडियात पाहिलं : चित्रा वाघ

  • 25 Feb 2021 11:35 AM (IST)

    वानवडी पोलिसातील सिनिअर पीआय लगड यांचा रगेलपणा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न : चित्रा वाघ

    पूजा चव्हाणचा फ्लॅट सील, वरच्या फ्लॅटमध्ये पाहणी, माझ्या कमरेइतके उंच ग्रील, वानवडी पोलिसातील सिनिअर पीआय लगड यांचा रगेलपणा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न : चित्रा वाघ

  • 25 Feb 2021 09:44 AM (IST)

    नाशिक महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूक, भाजपाला मनसेची पुन्हा एकदा टाळी

    नाशिक - महापालिका स्थायी समिती सभापती निवडणूक, भाजपाला मनसेची पुन्हा एकदा टाळी, स्थायी समिती सभापती निवडणुकीत मनसे भाजपला मदत करणार, भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचे 8 सदस्य, स्थायी निवडणुकीत मनसे ठरणार किंगमेकर, मात्र,सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची खबरदारी, स्थायी समितीचे भाजपाचे 8 सदस्य गुजरातला रवाना

  • 25 Feb 2021 09:23 AM (IST)

    मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ झनके निलंबित

    मुक्ताईनगर गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ झनके निलंबित, जिल्ह्यातील 13 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना शाळेवर येणे क्रमप्राप्त आहे, सिओ यांना चुकीच्या माहिती देणे व शिक्षकांची अनुपस्थिती वरून कारवाई, कोरोनाच्या काळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, माहिती जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी दिली, शिक्षण विभागात मोठी घडामोड

  • 25 Feb 2021 09:22 AM (IST)

    बार्शी तालुक्यात गोदामातील 19 लाखांची तूर गायब

    सोलापुर - बार्शी तालुक्यात गोदामातील 19 लाखांची तूर गायब, वामा वेअर हाऊस मध्ये शेतकऱ्याने ठेवलेली तूर गायब, नरहरी साहेबराव अंधारे या वयोवृद्ध शेतकऱ्याची तूर गायब, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वेअर हाऊसचा मालक संतोष बागमार आणि मध्यस्थ आडत व्यापारी किरण शिराळच्या विरोधात गुन्हा दाखल

  • 25 Feb 2021 09:21 AM (IST)

    सोलापूर शहरात 565 चाचण्यांमधून 30 रुग्ण पॉझिटीव्ह

    सोलापुर - शहरात 565 चाचण्यांमधून 30 रुग्ण ग्रामीण भागात सतराशे 28 चाचण्यांमधून 65 रुग्ण आढळले, गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू नाही, ग्रामीण भागातील एकूण बाधितांची संख्या 40 हजार 332, तर शहरातील एकूण बाधितांची संख्या 12 हजार 251 वर,351 जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  • 25 Feb 2021 08:59 AM (IST)

    कागल तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ, सेनापती कापशी गावच्या वेशीवर टस्कर हत्ती

    कोल्हापूर - कागल तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ, सेनापती कापशी गावच्या वेशीवर टस्कर हत्ती, पहाटे हत्ती दाखल झाल्याने नागरिकांमध्ये घबराट, न विभागाला वर्दी देऊनही अधिकारी-कर्मचारी आलेच नाहीत, हत्ती बिथरल्याने दुर्घटनेची शक्यता, तमनाकवाडा - कापशी गावच्या शेतात हत्तीचा वावर, हत्तीला पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी

  • 25 Feb 2021 08:59 AM (IST)

    सोलापूर आंतरराज्य सीमेवर आजपासून पोलीस महसूल आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथक नाकाबंदी करणार

    सोलापूर - आंतरराज्य सीमेवर आजपासून पोलीस महसूल आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथक नाकाबंदी करणार, कर्नाटक सीमेवरती ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तपासणी चौकशी होणार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

  • 25 Feb 2021 08:57 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात 281 कोरोना रुग्णांची वाढ

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात 281 कोरोना रुग्णांची वाढ, रुग्णांचा आकडा पोचला 46721 वर, तर काल दिवसभरात 71 रुग्णांना देण्यात आली सुट्टी, सध्या रुग्णालयात 1312 रुग्णांवर उपचार सुरू, तर काल दिवसभरात 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

  • 25 Feb 2021 08:03 AM (IST)

    कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीतील घोळ मिटवा मगच निवडणूका घ्या, भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी 

    कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ मिटवा मगच निवडणूका घ्या, भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी, त्रुटी दूर न करता निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयात जाण्याचा भाजपचा इशारा, बहुतांशी प्रभागातील हजार ते बाराशे मतदार इतर प्रभागात गेल्याचा भाजपचा दावा, नवी प्रारूप यादी जाहीर करण्या सह मतदार यादीत घोळ घालणाऱ्या अधिकाऱ्याकर कारवाईची ही केली मागणी

  • 25 Feb 2021 08:02 AM (IST)

    औरंगाबाद महापालिकेच्या हद्दवाढीसाठी प्रस्ताव तयार

    औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या हद्दवाढीसाठी प्रस्ताव तयार, औद्योगिक वसाहतीतील वाळूज आणि पंढरपूर येणार महापालिकेत, वाळूज पंढरपूरला महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव तयार, हद्दवाढीचा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात, पुढच्या आठवड्यात अहवाल शासनाला सादर करण्याची तयारी

  • 25 Feb 2021 08:01 AM (IST)

    कोल्हापुरात चार जिल्ह्यात जप्त केलेली दारु बंदी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली फस्त

    कोल्हापूर - चार जिल्ह्यात जप्त केलेली दारू बंदी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली फस्त, कोल्हापुरातील दारूबंदी विभागाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अजब प्रकार, या प्रकरणी सात जणांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सहा जणांना पोलिसांनी केली अटक तर एक संशयित पसार, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईतील दारू, 32 गुन्ह्यातील दारू तपासणी आधीच कर्मचाऱ्यांनी फस्त केल्याच आलं उघडकीला

  • 25 Feb 2021 08:00 AM (IST)

    माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पून्हा अटक होण्याची शक्यता

    औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पून्हा अटक होण्याची शक्यता, एका जुन्या प्रकरणातील जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज, पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना मिळाला होता जामीन, पुन्हा गौरवर्तन न करण्याच्या अटीवर मिळाला होता जामीन, हर्षवर्धन जाधव यांच्याकडून गौरवर्तन झाल्याचा दावा करत उच्च न्यायालयात अर्ज, सरकारी वकील डी आर काळे यांच्या वतीने केला उच्च न्यायालयात अर्ज, जामीन का रद्द करू नये यासाठी हर्षवर्धन जाधव यांना नोटीस

  • 25 Feb 2021 07:59 AM (IST)

    वनमंत्री संजय राठोड यांच्यापासून नागपुरातील शिवसैनिक दूरच

    वनमंत्री संजय राठोड यांच्यापासून नागपुरातील शिवसैनिक दूरच, नागपूर विमानतळावर काल शहरातील एकंही शिवसैनिक नाही, राठोड नागपूरचे संपर्कमंत्री असूनंही त्यांच्या भेटीला एकंही शिवसैनिक नाही, मुख्यमंत्र्यांचा आदेश मोडत पोहोरादेवीत गर्दी केल्यामुळे शिवसैनिक नाराज?

  • 25 Feb 2021 07:58 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 424 नवीन रुग्ण

    नाशिक - जिल्ह्यात दिवसभरात 424 नवीन रुग्ण, यामध्ये शहरातील 260 जणांचा समावेश, एक्टिव्ह रुग्णसंख्या 2162 वर पोहीचली, ग्रामीण भागात सर्वाधिक 85 रुग्ण निफाड तालुक्यात, आकडा वाढत असल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली

  • 25 Feb 2021 07:57 AM (IST)

    नाशिक शहरासह आता ग्रामीण भागात देखील विना मास्क दिसल्यास 1000 रुपये दंड

    नाशिक - शहरासह आता ग्रामीण भागात देखील विना मास्क दिसल्यास 1000 रुपये दंड, मास्क नीट घातलेला नसेल तरी देखील होणार दंड, तहसीलदारांना कारवाईचे अधिकार, तसेच जमा झालेल्या दंडाच्या रकमेचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी देखील तहसीलदारांवर

  • 25 Feb 2021 07:31 AM (IST)

    नागपुरात अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवारी सर्व व्यवहार बंद

    अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवारी सर्व व्यवहार बंद, नागपुरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय,  मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी जारी केले सुधारीत आदेश,  ग्रंथालय, अध्ययन कक्ष, स्वीमिंग पुलंही राहणार बंद, आजपासून मंगल कार्यालय, लॅानमधील लग्न समारंभास प्रतिबंध

  • 25 Feb 2021 07:21 AM (IST)

    पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून 580 कोटींचे वीजबिल जमा

    पुणे - पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून 580 कोटींचे वीजबिल जमा, महावितरण कंपनीच्या आवाहनाला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांचा प्रतिसाद, विभागातील 4 लाख 54 हजार थकबाकीदार वीजग्राहकांनी गेल्या 23 दिवसांमध्ये 579 कोटी 88 लाख रुपयांचा भरणा केलाय, गेल्या 1 एप्रिल 2020 पासून या ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरलेले नव्हते, मात्र वीजबिल भरण्यास सर्वच थकबाकीदार ग्राहकांनी आता वेग दिला आहे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये 26 लाख 47 हजार ग्राहकांकडे एकूण 1690 कोटी 54 लाख रुपयांची थकबाकी.

  • 25 Feb 2021 07:19 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा ब्लास्ट, जिल्ह्यात 24 तासांत 1181 नव्या रुग्णांची नोंद

    नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा पुन्हा ब्लास्ट, जिल्ह्यात 24 तासांत 1181 नव्या रुग्णांची नोंद, 24 तासांत 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 7184 वर, दक्षिण-पश्चिम नागपूरात सर्वाधिक कोरोना रुग्ण, जयताळा, इंद्रप्रस्त ले आऊट, लक्ष्मीनगर हॅाटस्पॅाट

  • 25 Feb 2021 07:14 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये खेळत असताना 12 वर्षीय मुलाचा सातव्या मजल्यावरील गॅलरीतून पडून मृत्यू

    पिंपरी-चिंचवड -खेळत असताना 12 वर्षीय मुलाचा सातव्या मजल्यावरील गॅलरीतून पडून मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना, अथर्व गावडे असं त्या मुलाचं नाव होतं.अथर्व सायंकाळी त्याच्या सहा वर्षीय भावासोबत गॅलरीत खेळत होता, तेव्हा आई घरकामात व्यस्त होती, खेळता-खेळता अथर्व गॅलरीवर चढला आणि तोल जाऊन तो खाली पडला, यात त्याचा मृत्यू झाला, पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत

  • 25 Feb 2021 06:37 AM (IST)

    कोया पुनेमची कचारगड यात्रा यंदा कोरोना संकटामुळे रद्द, 36 वर्षांची परंपरा खंडित

    गोंदिया सालेकसा दरवर्षी माघ पौर्णिमेला पाच दिवस चालणारी कोया पुनेमची कचारगड यात्रा यंदा कोरोना संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रशाशनाने घेतला आहे, त्यामुळे मागील 36 वर्षांपासून अविरत चालणारी कचारगड यात्रेची परंपरा यंदा खंडित होणार आहे

  • 25 Feb 2021 06:34 AM (IST)

    रुग्णालयाच्या तळघरात लाखो रुपयांचा अवैध औषध साठा, चंद्रपुरात ख्यातनाम रुग्णालयावर अन्न औषध प्रशासनाची धाड

    चंद्रपूर : शहरात ख्यातनाम रुग्णालयावर अन्न औषध प्रशासनाची धाड, रुग्णालयाच्या तळघरात लाखो रुपयांचा अवैध औषध साठा, झोपेच्या गोळ्यांसह अन्य वेगवेगळ्या औषधांचा साठा पकडल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ, धाडीदरम्यान संगणकीय नोंदीत साठ्यात फरक आढळल्याने रुग्णालयाची केली कसून तपासणी, डॉ. प्रकाश मानवटकर यांच्या एकोरी वॉर्डातील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात कोरोना काळात जीवनावश्यक औषधी साठा आढळल्याने कारवाई, हा सर्व साठा विना परवाना आणि आदर्श स्थितीत साठवून न ठेवल्याने कारवाई

  • 25 Feb 2021 06:32 AM (IST)

    सनी लियोनीच्या गाडीच्या नंबरचा वापर करून मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन

    प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीच्या गाडीच्या नंबरचा दुरुपयोग, सनी लियोनीच्या गाडीच्या नंबरचा वापर करून मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन, Mh 05 CT 1010 या अभिनेत्री सनी लिओनीच्या गाडीचा नंबरचा वापर करून एका व्यक्तीने वाहतूक नियमाचे 2020 पासून मुंबईत उल्लंघन केले, कोकिळाबेन हॉस्पिटलासमोर या गाडीला ट्रेस करण्यात आलंय, सनी लिओनीचा ड्रायव्हर अकबर खाम याने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, या फसवणुकीप्रकरणी पियुष रामेश्वर सेन याच्याविरोधात गुन्हा दाखल, वरळी वाहतुक पोलिसांकडे करण्यात आली होती आधी तक्रार

Published On - Feb 25,2021 9:46 PM

Follow us
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.