AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | ‘अशा भ्रष्ट माणसांना तुम्ही राजकारणासाठी….’, ‘या’ नेत्यावरुन दमानियांचा भाजपाला थेट सवाल

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात जोरदार राजकारण सुरु आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन राजकीय नेत्यांमध्येच दोन गट पडले आहेत. आता समाजसेविका अंजली दमानिया यांनी याच मुद्यावरुन भाजपाला थेट सवाल केला आहे.

Maratha Reservation | 'अशा भ्रष्ट माणसांना तुम्ही राजकारणासाठी....', 'या' नेत्यावरुन दमानियांचा भाजपाला थेट सवाल
Anjali damania
| Updated on: Feb 02, 2024 | 9:00 AM
Share

Maratha Reservation | सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुनच राजकीय नेत्यांमध्येच दोन गट पडल्याचे दिसत आहे. एकाबाजूने छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला कडाडून विरोध करत आहेत, त्याचवेळी दुसऱ्याबाजूने मराठा नेते भुजबळांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी राज्य सरकारने मागच्या आठवड्यात मान्य केली. कुणबी नोंद सापडणाऱ्या कुटुंबालाच नव्हे, तर त्याच्या सग्या-सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य केली आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकवटत आहेत. आरक्षणावरुन मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी बांधव आमचे भाऊ आहेत, हे राजकीय नेतेच भांडण लावण्याचा प्रयत्न करतात अस म्हटलय.

दरम्यान भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या समाजसेविका अंजली दमानिया यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. ‘भुजबळ भाजपच्या वाटेवर? आहेत का?’ असा प्रश्न त्यांनी X वर विचारलाय. “एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? असा त्यांचा सवाल आहे. अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशा बोचऱ्या शब्दात अंजली दमानिया यांनी भाजपावर टीका केली आहे. अंजली दमानिया यांनी याआधी सुद्धा अनेकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरण लावून धरली होती.

‘छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घाला’, असं कोणी म्हटलं?

दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.