“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटिव्ह राहतील, पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह”

| Updated on: Dec 02, 2020 | 9:47 PM

शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटिव्ह राहतील. मात्र, धनगर आरक्षणाविषयी ते पॉझिटिव्ह आहेत, असं अण्णा डांगे म्हणाले. (Sharad Pawar dhangar reservation)

शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटिव्ह राहतील, पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह
Follow us on

धुळे : “शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटिव्ह राहतील. मात्र, धनगर आरक्षणाविषयी ते पॉझिटिव्ह आहेत, असे वक्तव्य धनगर समाज महासभेचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केले. ते धुळ्यात धनगर समाज महासभेच्या अधिवेशनात बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. (Anna Dange said that Sharad Pawar is positive about dhangar reservation)

सध्या धुळ्यात धनगर समाज महासभेचे दोन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी बोलताना “एकवेळ कोरोनाबाबत शरद पवार निगेटिव्ह राहतील. मात्र, धनगर आरक्षणबाबत ते पॉझिटिव्ह आहेत. महाविकास आघाडी सरकार धनगर समाजाला न्याय देईल,” असे अण्णा डांगे म्हणाले. तसेच, धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, धनगर आरक्षणच्या प्रश्नासंदर्भात पुढील दिशा 3 डिसेंबर रोजी ठरणार आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी 29 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडीला चांगलंच घेरलं होतं. मंडल आयोग (Mandal Commission) लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; असा थेट सवाल त्यांनी विचारला होता. तसेच, “इतरांचा अधिकार कमी करा अशी मागणी मराठा समाजाने कधीच केली नाही. पण आमच्यावर अन्याय का? ज्यांनी अन्याय केला ते आज सत्तेत आहेत. अन्य समाजाचं आरक्षण, अधिकार अबाधित ठेवा. पण मराठा समाजावर अन्याय का?” असा सवालही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला होता.

दरम्यान, मराठा आरक्षणाविषयी बोलताना, “मला कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करायचं नाही. मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. फ़डणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. बुधवारी ( 2 डिसेंबर) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संबंधित बातम्या :

फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

पक्ष सोडताना दिल्लीवरुन फोन, पक्ष का सोडता अशी विचारणा : एकनाथ खडसे

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत

(Anna Dange said that Sharad Pawar is positive about dhangar reservation)