महाविकास आघाडी सरकारमधील अजून एक माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्याच्या ईडी चौकशीची शक्यता, प्रकरण काय?

अस्लम शेख यांनी कथितरित्या सीआरझेड नियमांचा उल्लंघन करुन मढ बेटावर 2 डझनपेक्षा अधिक फिल्म स्टुडिओची अनधिकृत बांधकामाला कथितरित्या परवानगी दिल्याबद्दल अस्लम शेख यांची ईडी चौकशी होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील अजून एक माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्याच्या ईडी चौकशीची शक्यता, प्रकरण काय?
अस्लम शेख, माजी मंत्रीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 8:33 PM

मुंबई : महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारमधील एक माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेत्याची ईडी चौकशी सुरु होण्याची शक्यता आहे. ईडीकडून माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या मतदारसंघातील मढ मार्वे परिसरात अवैध पद्धतीने सुरु असलेल्या फिल्म स्टुडिओच्या चौकशी केली जाऊ शकते. अस्लम शेख यांनी कथितरित्या सीआरझेड नियमांचा उल्लंघन करुन मढ बेटावर 2 डझनपेक्षा अधिक फिल्म स्टुडिओची अनधिकृत बांधकामाला (Illigal Construction) कथितरित्या परवानगी दिल्याबद्दल अस्लम शेख यांची ईडी चौकशी होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडे याबाबत तक्रारी आल्या असून त्यानंतर ईडीने हे प्रकरण दाखल केलं आहे. मात्र, अद्याप ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

महाविकास आघाडीतील नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा

यापूर्वी पर्यावरण आणि वन मंत्रालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टबाबत चिंता व्यक्त केली होती. रिसॉर्टच्या निमिर्तीमध्ये कोस्टल नियमांच्या तरतुदींचे कथितरित्या उल्लंघन केल्या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ईडीने परब यांच्यावर तसंच रिसॉर्ट परिसर आणि त्यांच्याशी संबंधित अनेक लोकांवरही छापे टाकले आहेत. महाविकास आघाडीतील माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत.

अस्लम शेख यांची अद्याप प्रतिक्रिया नाही

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मढ मार्वे बेटावर झालेल्या बांधकामाची पाहणी केली आणि अस्लम शेख यांच्या कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या काळात अस्लम शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर केंद्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अस्लम शेख यांची या प्रकरणात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.