AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा अध्यक्षाची निवड आज होणार? अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक?

पण तो अधिकारच राज्यपालांना नसल्याची भूमिका ठाकरे सरकारनं घेतलीय. ह्या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांची आजच्या निवडीचं काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

विधानसभा अध्यक्षाची निवड आज होणार? अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 8:07 AM
Share

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज सर्वाचं लक्ष असेल ते विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर. कारण ह्याच निवडणुकीवरून राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात नवा संघर्ष उभा राहिलाय. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी ठाकरे सरकारनं राज्यपालांची रितसर परवानगी मागितलीय पण राज्यपालांनी निवड प्रक्रियेवर बोट ठेवत सरकारला कायद्यातल्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पण तो अधिकारच राज्यपालांना नसल्याची भूमिका ठाकरे सरकारनं घेतलीय. ह्या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांची आजच्या निवडीचं काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

नेमकं काय होईल? राज्यपालांनी जरी निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला असला तरीसुद्धा निवडणूक रद्द करावी अशी कुठलीही सुचना राज्यपालांनी दिली नसल्याचं ठाकरे सरकारच्या टॉपच्या मंत्र्यांचं म्हणनं आहे. त्यावरचा संभ्रम दूर करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी निवडणूक घ्यावी की नाही अशी विचारणा सरकारनं राज्यपालांकडे केल्याचं समजतं. त्यावर राज्यपाल काय उत्तर देतात याची सरकारला प्रतिक्षा आहे. पण राज्यपालांनी काहीच कळवलं नाही तर ठरल्याप्रमाणे आज निवडणूक पार पडेल अशी सरकारच्या वतीनं शक्यता वर्तवली जातेय.

राज्यपालांचा आक्षेप कशावर? विधानसभा अध्यक्षाचं पद हे गेल्या 10 महिन्यांपासून रिकामं आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर हे पद भरण्यात यावं अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केली. त्यांनीही सरकारला विधानसभा अध्यक्ष लवकर निवडा असं पत्रं पाठवलं. पण राज्य सरकारनं त्यावर काही घाई केली नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड होईल असं होत असतानाच सरकारनं गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानपद्धतीनं निवड करण्याची घोषणा केली. कायद्यात तशी दुरुस्ती केली. ही दुरुस्ती बेकायदेशीर असल्याचं भाजपाचं म्हणनं आहे. राज्यपालांनीही कायद्यातला हा बदल चुकीचा असल्याचं सरकारला कळवलंय. त्यावरुनच राज्य सरकार विरुद्ध ठाकरे सरकार असा नवा संघर्ष उभा राहिलाय.

आघाडी सरकारची भूमिका काय? राज्यपालांनी कायद्यातल्या त्रुटी दाखवून दिली तरीसुद्धा लोकसभेच्या सभापतीची निवडही आवाजी पद्धतीनेच होते असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय. तर विधानसभेनं कायदा पास केलाय, त्यामुळे तो बेकायदेशीर कसा अशी भूमिका ठाकरे सरकारचे मंत्री घेतायत.

हे सुद्धा वाचा:

Wedding Fees | लग्नात बॉलिवूड कलाकारांची हजेरी हवीय? जाणून घ्या कोणता कलाकार किती मानधन आकारतो…

Scott Boland : 4 ओव्हर, 1 मेडन, 7 विकेट आणि 6 रन, स्कॉट बोलांडनं इंग्लंडचा कणा मोडला, पदार्पणात रेकॉर्डब्रेक ऐतिहासिक कामगिरी

Chanakya Niti | लहान मुलांची कृती म्हणजे ‘आरसा’ , तुमच्याच कृतीची पुनरावृत्ती, त्यांच्या समोर या 4 गोष्टी टाळाच नाहीतर…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.