Raj Thackeray: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू, रावण मध्ये जेवला की नाही? राज ठाकरेंचा मिश्किल सवाल
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी एका मुनीने सांगितलेली स्टोरी सांगितली. ही स्टोरी ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना हसू अनावर झाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित आज ठाण्यात पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांचे कौतुक केले. तर दुसरीकडे एका मुनीचे नाव घेता त्यावर निशाणा साधला आहे. त्या मुनीने सांगितलेली एका रावणाची कथा सांगितली आहे. हे ऐकून सर्वांना हसू अनावर झाले आहे.
“एक लाख पुत्र आणि दीड लाख म्हणे नातू”
राज ठाकरे मेळाव्यात म्हणाले की, तो एक कोणी तरी कुरळ्या केसांचा आहे ना, केस वाढवलेला… थोडा असा आहे.. काहीही सांगत असतो आणि लोक समोर बसलेली असतात भाबडेपणाने. जे तोंडाला येईल ते बोलत असतात. त्यादिवशी त्यांनी अशीच एक गोष्ट सांगितली. राम आणि रावणाचे जेव्हा युद्ध झाले तेव्हा त्या युद्धात रावणाचे १ लाख पुत्र किती एक लाख पुत्र आणि दीड लाख म्हणे नातू हे त्या नात्यात मारले गेले. मला जेवढी माहिती आहे तेवढी म्हणे रावणाला फक्त दहा तोंड होती. एक लाख मुलं? मध्ये जेवला बिवला की नाही? काहीही स्टोरी सांगतात.
अस्त्रालयाचे ऑस्ट्रेलिया?
पुढे ते म्हणाली, काय तर म्हणे युद्ध झाल्यानंतर तिथे सगळे अस्त्र पडले होते. रामाने जेव्हा ते पाहिले तेव्हा म्हणाला की हे अस्त्र कोणाच्या हाती लागले नाही पाहिजेत. ते हनुमानाला म्हणाले दहा हजार किलोमीटर दूर जाऊन हे सर्व ठेवून ये. हनुमानाने हे सर्व अस्त्र ठेवले आणि आला आहे. हे अस्त्र जिथे ठेवले ते अस्त्रालय झाले. त्याचे नंतर नामकरण झाले ऑस्ट्रेलिया. माझी नाही ही त्याची स्टोरी आहे. आता अस्त्रालयाचं जर ऑस्ट्रीलिया झाले असेल तर हॉलंडचं, न्यूझिलंडचं, इंग्लंडचं काय झालं असेल? काय करायचं? हे सगळं समोर चालू असताना समोर बसलेले मन लावून ऐकत असतात. हे काय चाललं आहे? कुठे चालला आहे देश? कुठे चाललो आहे आपण? मूळ समस्या काय आहे? देशातली परिस्थिती काय आहे?
‘सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो असायला पाहिजे. कारण पंतप्रधान आहेत. बाकी मतभेद शंभर असतील. पण तो दुसऱ्या भिंतीवर… त्या रांगेत नको. सराकारी कार्यालय, शाळा असतील, त्यांनी ही गोष्टी पाळली पाहिजे. त्यांनी सर्व पाळले पाहिजे. कोर्ट, सरकारी अस्थापनामध्येही कळलं पाहिजे. त्यामुळे आता सुधारणा करा. मला काही धोके दिसत आहेत. तुम्हाला वेगळ्या गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाणीवपूर्वक केला जात आहे. केला जाणार. त्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं. देशात सर्वत्र धर्माची झिंग आली आहे. धर्मांचा अभिमान समजू शकतो. पण झिंग नाही. धर्माभिमानी असले पाहिजे. धर्मांध नव्हे. असं वातावरण तयार केलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवलं जात आहे. त्याच्यातून राग निर्माण केला जात आहे. जेणेकरून इतर गोष्टीवरून दुर्लक्ष व्हावं, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.