इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद मनपात राडा

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गोंधळ झाला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सत्कार आणि अभिनंदनासाठी एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले.

इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद मनपात राडा

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गोंधळ झाला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सत्कार आणि अभिनंदनासाठी एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र त्याला अन्य पक्षातील नगरसेवकांनी विरोध केला. थेट महापौरांनीही त्याला विरोध दर्शवला. या सर्व प्रकारानंतर एमआयएम नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. याशिवा पाणी प्रश्नावरुन भाजप नगरसेवकांनी राजदंड पळवल्यामुळे अभूतपूर्व प्रसंग पाहायला मिळाला. या सर्व राड्याप्रकरणी 6 नगरसेवकांना 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.

दुसरीकडे पाण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनीही सभागृहात महापौरांसमोर ठिय्या मांडला. भाजप नगरसेवकही पाण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

यादरम्यान नगरसेवकांनी राजदंड पळवला. सत्तेत सहभागी असलेल्या भाजप सदस्यांनी राजदंड पळवला.महापालिकेत आधी पाण्यावरुन अभूतपूर्व गोंधळ झाला. मग इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरवावरुनही राडेबाजी पाहायला मिळाली.

पंतप्रधान मोदींचा अभिनंदनाचा ठराव पण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरवाला टोलवा टोलवी होत असल्याचा आरोप एमआयएम नगरसेवकांनी केला.

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्याचा बदला म्हणून शिवसेना-भाजप अभिनंदन प्रस्तावाला विरोध करत आहेत, असा आरोप एमआयएम नगरसेवकांनी केला. इतकंच नाही तर सातत्याने MIM नगरसेवकांवर अन्याय केला जातो, त्यामुळे आम्ही हायकोर्टात धाव घेऊन महापौरांना हटवण्याची मागणी करणार आहोत, असं एमआयएम नगरसेवक आरिफ हुसैनी यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *