वीजबिल माफीवरुन नितीन राऊतांकडून फसवणूक, विधानसभेत हक्कभंग आणणार; बबनराव लोणीकर संतापले

"वीज बिलामध्ये सवलत मिळेल असं सांगणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही असे सांगितले. महाराष्ट्र सरकारचा हा निर्लज्जपणा आहे," अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:13 PM, 17 Nov 2020
वीजबिल माफीवरुन नितीन राऊतांकडून फसवणूक, विधानसभेत हक्कभंग आणणार; बबनराव लोणीकर संतापले

मुंबई :वीजबिलामध्ये सवलत मिळेल असं सांगणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणतीही सवलत मिळणार नाही असे सांगितले. महाराष्ट्र सरकारचा हा निर्लज्जपणा आहे,” अशी घणाघाती टीका भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली. तसेच, विधानसभेच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग आणणार असल्याची माहितीही लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. (Babanrao Lonikar criticizes government on extra electricity bill)

“वीजबिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही. वीजबिल भरलेले नसल्यास तत्काळ वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. वीजबिलामध्ये सवलत मिळेल असं नितीन राऊत यांनी सांगितलं होतं. पण, आता वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाहीत असं राऊत म्हणत आहेत,” असं लोणीकर म्हणाले. तसेच, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरुनाही त्यांनी सरकारला घेरलं. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारला जाग आली. अजून किती आत्महत्या झाल्यानंतर सरकार निर्णय घेणार?, असा सवालदेखील लोणीकर यांनी यावेळी केला.

भारतीय जनता पार्टीने वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. त्यांनतर बिलामध्ये सवलत देण्यात येईल असे सरकारने सांगितले.परंतु, विद्यमान महाविकास आघाडी सरकारची नितीमत्ता जनतेच्या हिताची नाही. महाविकास आघाडी सरकारचा खोटारडा आणि निर्लज्ज चेहरा यानिमित्ताने सर्वसामान्य जनतेसमोर आला आहे, अशी टीका लोणीकर यांनी केली. तसेच, भाजप वाढीव आणि चुकीच्या बिलाविरोधात मोठे जनआंदोलन उभे करेल, असा इशाराही लोणीकर यांनी यावेळी दिला.

नितीन राऊत नेमकं काय म्हणाले?

वीज वापरली तितकेच बील आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बील नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बील सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असं नितीन राऊत म्हणाले. (Babanrao Lonikar criticizes government on extra electricity bill)

संबंधित बातम्या  :

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

‘विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?’, सदाभाऊ खोत यांचा उर्जामंत्र्यांना सवाल

श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप