छ. शिवाजी महाराज, आंबेडकरांचं उदाहरण देत बच्चू कडू यांनी आपलं तत्व सांगितलं… पाहा…

रवी राणा यांच्या आरोपांनंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. काय म्हणाले? पाहा...

छ. शिवाजी महाराज, आंबेडकरांचं उदाहरण देत बच्चू कडू यांनी आपलं तत्व सांगितलं... पाहा...
| Updated on: Oct 30, 2022 | 4:54 PM

अमरावती : रवी राणा (Ravi Rana) यांच्या आरोपांनंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. आपली तत्व आणि कामं याबाबत ते अधिक आक्रमतेने बोलताना दिसत आहेत. अमरावतीतील एक जाहीर सभेत बच्चू कडू (Bacchu Kadu) बोलले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचं उदाहरण देत बच्चू कडू यांनी आपलं तत्व लोकांना समजावून सांगितलं.

बाबासाहेब आंबेडकर यांचं काँग्रेससोबत कधी जमलं नाही. पण जेव्हा काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. मुघल जेव्हा स्वराज्यावर चाल करून येत होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी निजामशाहीला हाती घेऊन आपल्या दुश्मनांच्या तलवारीला तलवार लावली. त्यांच्याशी दोन हात केले. महाराजांनी कधीही आपली तत्व सोडली नाहीत. तसंच आम्ही कुठेही असलो, कुणाही राजकीय पक्षासोबत असलो तरी आम्ही आमच्या तत्वांना कधी सोडलं नाही, असं बच्चू कडू म्हणालेत.

आमचं मूळ तत्व हे सर्वसामान्य माणूस आहे. कुठल्याही समाजाचा, कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो व्यक्ती आमचा आहे. त्याच्यावर अन्याय होता कामा नये. पण जेव्हा आमच्या लक्षात येईल की, सर्वसामान्य माणसाच्या हक्कांवर गदा येतेय, असं दिसेल. तेव्हा सत्ता, आमदारकीला लाथ मारत सर्वसामान्यांसाठी हा बच्चू कडू सामान्य कार्यकर्ता म्हणून लढा देईल, असं शब्दही बच्चू कडू यांनी दिलाय.

सर्वसामान्य माणूस मला देवा समान आहे. मंदीर गिर गया त दुख नहीं होता लेकीन, आम आदमी अगर रुक जाता है तो दर्द होता है, असंही बच्चू कडू म्हणाले.