मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, पण…, बच्चु कडूंनी बंडांळीनंतरची खरी परिस्थिती सांगितली…

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 29, 2022 | 12:21 PM

मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, अशी कबुलीही बच्चु कडू यांनी दिली. यासह अन्य काही मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं.

मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, पण..., बच्चु कडूंनी बंडांळीनंतरची खरी परिस्थिती सांगितली...

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर अनेक प्रश्न चर्चेत आले. या आमदारांनी बंडखोरी नक्की का केली? ही बंडखोरी कशी केली. सगळे आमदार या बंडाळीसाठी तयार होते का? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले होते. त्याचं उत्तर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिलं आहे.मला गुवाहाटीवरून परत यायचं होतं, अशी कबुलीही त्यांनी दिली. अन्य काही मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

गुवाहाटीला गेल्यावर परतीचे दोर कापले गेले!

आमचे आमदार राजकुमार पटेल आधी गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर मीही गेलो. पण माझं असं म्हणणं होतं की, मी जाऊन एकनाथ शिंदेंसोबत काही मुद्द्यांवर बोलून परत येईल, असं वाटलं होतं. पण हे राजकारण आहे. त्यामुळे मलसा तिथून पर येता आलं नाही. कारण आम्हीही जेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी नगरसेवकांना घेऊन बाहेर जातो. तेव्हा त्यांनही आम्ही परत फिरू देत नाही. त्यामुळे तसंच माझ्यासोबतही झालं. हे राजकारण आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात,असं बच्चु कडू म्हणालेत.

शिंदेंसोबत का?

बच्चु कडू यांनी ठाकरे भेटत असल्याची कबुली दिली आहे. पण त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे मला भेटायचे. अपंगांचे प्रश्न घेऊन मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो. ते सर्वसामान्यांची कामं करायला तयार असायचे. पण आजूबाजूचे लोक कामच करायचे नाहीत. अधिकारी वर्ग टाळाटाळ करायचा. त्यामुळे लोकांची कामं व्हायची नाहीत. लोक विचारायचे की तुम्ही आता सत्तेत आहात राज्यमंत्री आहात. मग कामं का होत नाहीत?, असं बच्चु कडू म्हणालेत. दिव्यांग लोकांच्या संदर्भात अडीच वर्षात एकही मिटिंग झाली नाही, हे योग्य नाही. त्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असंही ते म्हणालेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI