तुमची उंची किती, बोलता किती? सुषमा अंधारेंच्या बाईपणावरही टीका करणारे कोण?
सुषमा अंधारे यांनी आपले अंथरूण पाहूनच पाय पसरावेत. कहाँ राजा भोज आणि कहाँ गंगू तेली... असा टोमणाही बाळा नांदगावकर यांनी लगावला.

मुंबईः सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि मनसे (MNS) नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणखीच विकोपाला जात आहेत. मनसे नेते बाळानांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी तर एका मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांच्या बाईपणावरही टीका केली. ते म्हणाले, तुमची उंची किती… बोलता किती? बाईने बाईसारखं बोलावं… तुमचा प्रवास कुठून कुठपर्यंत झालाय, हे सर्वांना माहिती आहे… असा इशाराच त्यांनी दिला. मुंबईतील कोकणवासियांसाठी मनसेतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नांदगावकर बोलत होते.
सुषमा अंधारे यांनी आपले अंथरूण पाहूनच पाय पसरावेत. कहाँ राजा भोज आणि कहाँ गंगू तेली… असा टोमणाही बाळा नांदगावकर यांनी लगावला. राज ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांचं खंडनही नांदगावकर यांनी केलं. कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, आपल्या साहेबांवर नेहमी आरोप करतात की साहेब भूमिका बदलतात. मात्र राज ठाकरे दिशा बदलवून इतिहास बदलतात. जे कधीही घडत नव्हतं ते राज ठाकरेंनी बदललं.
किती दिवस आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, आता सत्तेतपण असलो पाहिजेत. आमदार, खासदार आपले असावेत, त्यासाठी कामाला लागलं पाहिजे….
या कार्यक्रमात मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईदेखील उपस्थित होते. संदीप देशपांडे म्हणाले, मी ज्या गावात राहतो, त्याठिकाणी आपला सरपंच असला पाहिजे, असा संकल्प करायला हवा.
एकदा सरपंच पदी मनसेचा कार्यकर्ता बसला तर आमदारकी सोपी जाईल. राजकीय वातावरण ज्या पद्धतीने बदलतंय, त्याचा फायदा आपणही घेतला पाहिजे.
