आधी विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका, नंतर एकमेकांशेजारी बसून मनसोक्त गप्पा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील एकाच मंचावर (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together)  दिसून आले.

आधी विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका, नंतर एकमेकांशेजारी बसून मनसोक्त गप्पा
Follow us
| Updated on: Dec 29, 2019 | 8:22 AM

अहमदनगर : राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपानंतर नुकतंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील एकाच मंचावर (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together)  दिसून आले. विशेष म्हणजे थोरात आणि विखे पाटील एकाच सोफ्यावरही एकमेकांशेजारी बसलेले पाहायला मिळाले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together) आहे.

संगमनेर तालुक्यातील नामदेव गुंजाळ यांच्या मुलीच्या विवाह सभारंभासाठी या दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि विखे चक्क एकमेकांच्या शेजारी एकाच सोफ्यावर बसले. यावेळी या दोघांमध्ये चर्चा ही झाल्याच पाहायला मिळत आहे. मात्र ही चर्चा नक्की कशाची झाली याबाबत उत्सुकता अद्याप कायम आहे.

“बाळासाहेब थोरात काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार होते. काही भाजप नेत्यांशीही त्यांच्या गाठीभेटी झाल्या.” असा दावा विखेंनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र एका लग्नसभारंभात ते दोघेही एकमेकांशी शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together) आहेत.

राजकारणात वैरी असणारे समोर आले तर मित्रत्वाच्या नात्यानं भेटतात असे म्हटलं जातं. याला साजेसाच हा प्रसंग घडला. मात्र राजकीय वर्तुळात या निमित्ताने अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, कुणाकुणाला भेटले याची सर्व माहिती, विखेंचा दावा

काँग्रेस पक्षात एकत्र काम करताना या दोघांनी कायम एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण केलं. बाळासाहेब थोरात आता काँग्रेसमध्ये आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये. एकाच पक्षात असतानाही या दोघांनी एकमेकांवर कुरघोडी केल्या होत्या. विखे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाही. मात्र लग्न सभारंभात एकमेकांशेजारी बसण्याचा प्रसंग घडल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together) आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.