Zeeshan Siddique : वडिलांची निर्घृण हत्या, आता सैफवर हल्ला, झिशान सिद्दीकी काय म्हणाला?

Zeeshan Siddique : "देवेंद्र फडणवीस हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते. वडिलांसोबत घटना घडल्यानंतर ते तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रुग्णालयात आले होते. तेव्हा ते म्हणालेले की, झिशान तू चिंता करु नको. तुझे बाबा माझे मित्र होते"

Zeeshan Siddique : वडिलांची निर्घृण हत्या, आता सैफवर हल्ला, झिशान सिद्दीकी काय म्हणाला?
Zeeshan Siddique
| Updated on: Jan 18, 2025 | 1:08 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने आज मीडियाला तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “मी बिल्डरांची नावं पोलिसांना दिली आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर नाव जाहीर होतील. मला वाटतं, आता त्या बद्दल बोलणं उचित नाही” असं झिशान सिद्दीकी म्हणाले. झिशान सिद्दीकी यांच्यानुसार, पोलीस त्यांच्या स्टेटमेंटनुसार तपास करत नाहीयत. “कोर्टात जज सुद्धा पोलिसांना हेच विचारणार, त्यांचा मुलगा त्याच्यासोबत सुद्धा असच घडलं असतं. मला संशय आहे. मी पोलिसांना पुरावे दिलेत. त्यानंतरही बिल्डरांची चौकशी झाली नाही, तर लोकांचा कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास उडेल” असं झिशान सिद्दीकी म्हणाले.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना वांद्रे असुरक्षित झालय का? असा प्रश्न विचारला. “ज्या वांद्रयात माझा जन्म झाला. ज्या वांद्रयात मी माझं बालपण घालवलं. ते वांद्रे आणि आत्ताच वांद्रे यात फरक आहे. वांद्रे आता तेवढं सुरक्षित राहिलेलं नाही”

देवेंद्र फडणवीसांबद्दल काय म्हणाले?

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासात असं का होतय, गृहखात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. “देवेंद्र फडणवीस हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते. वडिलांसोबत घटना घडल्यानंतर ते तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रुग्णालयात आले होते. तेव्हा ते म्हणालेले की, झिशान तू चिंता करु नको. तुझे बाबा माझे मित्र होते. मी जे प्रश्न पोलिसांना विचारतोय, उद्या ते तेच प्रश्न पोलिसांना विचारणार आहेत. निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. बिल्डरांची चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मी मागितली आहे, लवकरच ती मिळेल” असं झिशान सिद्दीकी म्हणाले.

नितेश राणेंबद्दल काय म्हणाले?

महायुती सरकार आल्यानंतर कट्टरतावाद वाढलाय का? नितेश राणे मंत्रिपदावर असून सातत्याने हिंदू-मुस्लिम भेद वाढवणारी वक्तव्य करत आहेत, त्यावर झिशान सिद्दीकी म्हणाले की, “नितेश राणेंच व्यक्तीमत्व पर्सनल व्यक्तीत्व आहे. त्यांच्याच पक्षाचे राहुल नार्वेकर त्यांच्या वक्तव्यांच समर्थन करत नाहीत. आमचा धर्मनरिपेक्ष पक्ष आहे. हे महायुतीच स्टेटमेंट नाही. आम्ही नेहमीच अशा वक्तव्यांचा निषेध केलाय”