AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन आणि कॅमेऱ्यासमोर बोलताना भान ठेवा; ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सूचना

हा डेटाबॉम्ब घेऊन देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे गेले होते. | phone tapping Thackeray govt

फोन आणि कॅमेऱ्यासमोर बोलताना भान ठेवा; ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सूचना
डेटाबॉम्ब घेऊन देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे गेले होते.
| Updated on: Mar 27, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई: काही दिवसांपूर्वीच नव्याने उजेडात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणानंतर आता ठाकरे सरकारने (Thackeray Govt) आपल्या मंत्र्यांना खास सूचना दिल्या आहेत. सर्व मंत्र्यांनी फोन किंवा कॅमेऱ्यासमोर बोलताना भान ठेवावे. तसेच महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी खासगी मोबाईल क्रमांकांचा वापर करावा, असेही मंत्र्यांना सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Thackeray govt become more alert after phone tapping)

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. फोन टॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील काही नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या सगळ्याची इत्यंभूत माहिती फडणवीस यांच्या हाती लागली होती. हा डेटाबॉम्ब घेऊन देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे गेले होते. तसेच याप्रकरणात केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी, असा आग्रह आता भाजपने धरला आहे. त्यामुळे आता सावध झालेल्या ठाकरे सरकारने प्रत्येक पाऊल जपून टाकायचे ठरवले आहे.

‘तो अहवाल जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी तयार केला असावा’

फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केला. मी सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि नवाब मलिका यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

अहवाल मी नव्हे तर नवाब मलिक यांनी फोडला: फडणवीस

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

तसेच या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असे सुचविले होते. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या :

Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

(Thackeray govt become more alert after phone tapping)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.