Ajit Pawar : अजितदादांच्या आगमनापूर्वी फलकबाजी, आमचं ठरलंय, पण कुणाचं? यवतमाळात चर्चांना उधाण

| Updated on: Jul 29, 2022 | 8:18 PM

आमचं ठरलंय, असे पोस्टर यवतमाळात लावण्यात आलेत. पण, या पोस्टरवर नाव नाही. त्यामुळं कुणाचं काय ठरलं हे कळायला मार्ग नाही. राष्ट्रवादीतील काही नेत्यांच कदाचित काही ठरलं असेल. पण, ते काय करणार, कुठं जाणार. काय ठरलं, हे स्पष्ट करण्यात आलं नाही. त्यामुळं चर्चांशिवाय दुसरं काहीच नाही.

Ajit Pawar : अजितदादांच्या आगमनापूर्वी फलकबाजी, आमचं ठरलंय, पण कुणाचं? यवतमाळात चर्चांना उधाण
यवतमाळात चर्चांना उधाण
Follow us on

यवतमाळ : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या यवतमाळ शहर आगमना पूर्वी विश्राम भवन (Vishram Bhawan) परिसरात आमचं ठरलंय, अशा आशयाचे पोस्टर लावत पोस्टरबाजी (Posterbaji) करण्यात आली. मात्र नेमके हे फलक कोणाचे आणि कश्यासाठी लागले हे अनुत्तरित आहे. या फलकावर पक्षाचे चिन्हे व नेत्याचे नाव नाही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये या फलकाबाबत संभ्रम आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीतून (grouping) ही फलक बाजी केली असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे विदर्भातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. आज ते यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते येणार असल्यानं तत्पूर्वीच विश्राम भवन परिसरात आमचं ठरलंय, असे पोस्टर लागलेत. ते कुणी लावलेत. का लावलेत, यासंदर्भात काही माहिती नाही. पण, या पोस्टर्समुळं यवतमाळ जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय.

आमचं ठरलंय पण कुणाचं

आमचं ठरलंय, असे पोस्टर यवतमाळात लावण्यात आलेत. पण, या पोस्टरवर नाव नाही. त्यामुळं कुणाचं काय ठरलं हे कळायला मार्ग नाही. राष्ट्रवादीतील काही नेत्यांच कदाचित काही ठरलं असेल. पण, ते काय करणार, कुठं जाणार. काय ठरलं, हे स्पष्ट करण्यात आलं नाही. त्यामुळं चर्चांशिवाय दुसरं काहीच नाही.

कधी कुठं जायचं हे मी ठरवेन

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मी विरोधीपक्ष नेता म्हणून दौरा करतोय. मी हाडाचा शेतकरी आहे. अधिवेशन सुरु होईल तेव्हा सांगायला सोपं जातंय. मी कधी जावं हा माझा प्रश्न, बाकीच्यांनी नाक खुपसू नये. आज मुख्यमंत्री पण म्हणाले अजित दादा उशिरा गेले. मी कधी जायचं मी ठरवेल. आज सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, हा कधी गेला? हे प्रश्न उपस्थित करु नये.

हे सुद्धा वाचा

पंचनामे सगळे झाले नाही

अजित पवार म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झालंय. तुम्ही दोघे खंबीर असला तरीही 36 जिल्ह्यात पालकमंत्री नेमले तर ते तिथे जाऊन आढावा घेऊ शकतात. काही कमी पडलं तर इथून थेट मंत्रालयात संपर्क साधता येते. हे आम्ही विचारतोय, पण याची उत्तरं देणं सोडून हे बालीश पणासारखं विचारतात हा कधी गेला उशिरा गेला, हे योग्य नाही, असंही त्यांनी ठणकावलं.