मुंबईः आगामी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा रस्त्याच्या बिकट अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय स्थिती आहे. यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. लोकप्रतिनिधी, माध्यमप्रतिनिधी झटत आहेत, मात्र जोपर्यंत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मनात येत नाही, तोपर्यंत हा रस्ता सुधारणार नाही, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केलाय. विधानसभेत (Maharashtra Assembly) आज मुंबई गोवा मार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी घरी जाणे किती आव्हानात्मक स्थिती आहे, या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधला जावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तसेच बांधकाम मंत्र्यांनी तत्काळ रस्त्याची पाहणी करावी, अशी लक्षवेधी भास्कर जाधव यांनी मांडली.