#BiharElection2020: नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी: पृथ्वीराज चव्हाण
नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. (Prithviraj Chavan said BJP is successful into decrease importance of Nitish Kumar)

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील आताचे कल कायम राहिलेत एनडीए पुढं जाताना दिसत आहे. मात्र, त्याबद्दल आताच काही बोलता येणार नाही. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसला 27 च्या आसपास जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. ते होताना दिसत नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. (Prithviraj Chavan said BJP is successful into decrease importance of Nitish Kumar)
लोजपाला वेगळ लढायला लावून नितीशकुमार यांच्या पक्षाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. आमची अपेक्षा मागील जागांपेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा होती. काँग्रेस हा राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र त्यात यश येताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. निवडणूक प्रक्रिया ही निष्पक्षपातीपणे झाली पाहिजे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
सभांचा उपयोग वातावरण निर्मिती करण्यासाठी होतो. राजकारण बदलेलं आहे. मोठ्या सभा झाल्यातरी लोकं प्रभावित होते, असं वाटत नाही. आघाडी करुन लढतो तेव्हा स्थानिक लोकांचा निर्णय असतो. 75 टक्के मतांची मोजणी व्हायची आहे. यानंतर सप्ष्टपणे बोलता येईल, असंही चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती चांगली नसल्याने आक्रमकपणे प्रचार करु शकत नाही. राहुल गांधी यांनी कोणत्या ठिकाणी आणि किती सभा घ्यायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जातो, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. बिहारच्या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी जास्त जागा मिळवण्याची शक्यता कमी आहे, असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीए सध्या 128 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे भाजप नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महागठबंधन सध्या 104 जागांवर आघाडीवर आहे.
रात्री उशिरापर्यंत चालणार मतमोजणी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या संथ वेगामुळे प्रत्यक्ष निकाल स्पष्ट होण्यास आणखी सहा ते सात तासांचा अवधी लागू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या जवळपास 30 हजारांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत साधारण 20 टक्केच मतांची मोजणी होऊ शकली होती. अद्याप 3 कोटी मतांची मोजणी बाकी असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
(Prithviraj Chavan said BJP is successful into decrease importance of Nitish Kumar)
