सोलापुरात महाविकास आघाडीचा मनसुबा फसला, महाविकास आघाडीला समविचारी आघाडीचा धक्का 

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे आणि समविचारी पक्षाचे अनिरुद्ध चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे दिलीप चव्हाण यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडे संख्याबळ असून सुद्धा त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

सोलापुरात महाविकास आघाडीचा मनसुबा फसला, महाविकास आघाडीला समविचारी आघाडीचा धक्का 
Follow us
| Updated on: Dec 31, 2019 | 10:27 PM

सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मनसुबा भाजप आणि समविचारी आघाडीने उधळून लावला. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे आणि समविचारी पक्षाचे अनिरुद्ध चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे दिलीप चव्हाण यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडे संख्याबळ असून सुद्धा त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत शरद पवारांनी लक्ष घातले होते. मात्र, या निवडणुकीत मोहिते पाटील हे सरस ठरले आहेत. त्यामुळे बारामतीकरांना अकलूजकरांचा हा एक धक्का मानला जात आहे.

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र, या निवडणुकीसाठी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पद आपल्याकडे ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले होते. त्यासाठी गेले चार पाच दिवस राष्ट्रवादी, काँग्रेस, नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु होते. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेत पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व असल्याचं सिद्ध झालं. परिणामी महाविकास आघाडीचा फज्जा उडाला. राष्ट्रवादीने आपले सदस्य सहलीला पाठवले होते, तर भाजप आणि मोहिते पाटील गटाकडून व्यक्तीगत  बैठका घेण्यावर जोर देण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा धोबीपछाड होत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणून आलेले, मात्र मोहिते पाटील गटाचे अनिरुद्ध चव्हाण हे अध्यक्ष झाले आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील गटाने समर्थन दिलं.

66 सदस्यांपैकी भाजपच्या अनिरुद्ध चव्हाण यांना 37 तर राष्ट्रवादीचे त्रिभुवन धाईंजे याना 29 मतं मिळाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे दिलीप चव्हाण यांना 35 तर राष्ट्रवादीचे विक्रांत पाटील यांना 31 मतं मिळाली. नुकतेच विजयसिंह मोहिते पाटलांनी ‘मी अजून राष्ट्रवादीत आहे’ असं म्हंटल होतं. मात्र, त्याच विजयसिंह मोहिते पाटील गटाने राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे. राष्ट्रवादीची सदस्य संख्या सोलापूर जिल्हा परिषदेत 23 आहे, त्यातील 6  मोहिते गटाचे आहेत, तर शिवसेनेचे 5 पैकी 4 करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील गटाचे आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे हा करिष्मा झाला.

इकडे राष्ट्रवादीचे प्रयत्न फसल्याची जाहीर कबुली देत भाजपने आमच्या सदस्यांना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घोडेबाजार रंगवल्यामुळे आमच्या सदस्यांनी मतदान केल्याचं सांगत अशा सदस्यांवर कारवाई करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

सोलापूर जिल्हा परिषद आणि मोहिते पाटील असे काहीसे समीकरण आहे. मोहिते पाटलांशिवाय सोलापूर जिल्हा परिषदमध्ये अजित पवार यांच्या समर्थकांकडून प्रयत्न केले गेले. मात्र, मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्हा परिषद असं समीकरण पुन्हा सिद्ध झालं.

राज्यात शिवसेनेचा मुखमंत्री आहे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा देत भाजपला सत्तेपासून रोखलं. मात्र, सोलापुरात जिल्हा परिषदेत शिवसनेच्या सदस्याला भाजपने अध्यक्ष म्हणून निवडून आणून राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवलं.

Solapur Zila parishad elections

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.