AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच यांचा ‘चंदा’, आशिष शेलारांचा हल्लाबोल

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. याच महाराष्ट्र बंदवरुन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

बंद आणि विरोध यांचा 'धंदा', गोळा होतो त्यावरच यांचा 'चंदा', आशिष शेलारांचा हल्लाबोल
आशिष शेलार
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 9:08 AM
Share

मुंबई :  लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. याच महाराष्ट्र बंदवरुन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. बंद आणि विरोध यांचा धंदा, गोळा होतो त्यावरच यांचा चंदा, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली आहे.

महाराष्ट्रात आज सत्ताधारी सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदचा एल्गार पुकारला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मात्र विरोधी पक्ष भाजपने बंदमध्ये सहभागी होऊ नये, असं आवाहन करताना सत्ताधाऱ्यांवर धारदार शब्दांचे बोचरे वार केलेत.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित”बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले”

“एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय.. कोस्टल रोडला विरोध…नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध.. मेट्रोचेही हे विरोधकच.. हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा “धंदा” गोळा होतो त्यावरच “चंदा”!

आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद, ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल, आई दुर्गामाते जनतेला दे “बळ”! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!, अशा शब्दात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय.

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा बंदला पाठिंबा

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबरला तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.

(BJP Ashish Shelar Attacked mahavikas Aaghadi Over maharashtra Bandh)

हे ही वाचा :

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे, सामनातून आवाहन

Maharashtra Bandh | पुण्यातील पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद, व्यापारी महासंघाचाही बंदला पाठिंबा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.