AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

काँग्रेस तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं जगजाहीर आहे. आता भाजपची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सत्यजित तांबेंना भाजपा पाठिंबा देणार का? चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 13, 2023 | 3:48 PM
Share

गजानन उमाटे, नागपूरः सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितला तर तो देणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेच्या (MLC Election) पदवीधर मतदारसंघातील नाशिक विभागात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. तर काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यामुळे काँग्रेस तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं जगजाहीर आहे. आता भाजपची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सत्यजित तांबे यांनी आतापर्यंत आम्हाला पाठिंबा मागितलेला नाहीये. पाठिंबा मागितलाच तर पार्लमेंटरी बोर्डाकडे हा विषय नेण्यात येईल. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.

नाशिकमध्ये 3 ते 4 उमेदवारांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरले आहेत. त्यांना एबी फॉर्म नाही. धनराज विसपुते, शुभांगी पाटील यांनीही अर्ज भरले आहेत. या अपक्षाच्या लढाईत कुणी समर्थन मागितलं तर केंद्रिय बोर्डामार्फत निर्णय घेतला जाईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

नाट्यमय घडामोडी काय?

  • नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगलाय.
  •  येथून डॉ. सुधीर तांबे यांना आधी काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिली.
  •  मात्र सुधीर तांबे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.
  •  तांबे यांनी पक्षाला धोका दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
  • त्यामुळे काँग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नाही, हे निश्चित आहे.
  •  तर सत्यजित तांबे यांनीही प्रतिक्रिया दिली. मी दोन अर्ज भरले. एक काँग्रेसकडून आणि दुसरा अपक्ष म्हणून. काँग्रेसकडून माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर न आल्याने मी अपक्ष म्हणूनही अर्ज भरल्याचं त्यांनी सांगितलं.
  •  अपक्ष म्हणून भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलंय.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच