Chitra Wagh : मी सभेत बोलताना दगडं मारता,अशा गोष्टींना घाबरणार नाही; चित्रा वाघ यांच्या सभेत काय घडलं

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

Chitra Wagh : मी सभेत बोलताना दगडं मारता,अशा गोष्टींना घाबरणार नाही; चित्रा वाघ यांच्या सभेत काय घडलं
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 11:27 PM

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. भाजपनं (BJP) कोल्हापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) या आज प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये होत्या. कोल्हापूर येथील प्रचारात बोलताना सभेत दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. वाह रे बहाद्दरांनो…, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां. आज संध्याकाळी भाजपा उत्तर कोल्हापूर (Kolhapur by election)  उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ सभेत मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन केला आहे. तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा. असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी कोल्हापुरातील प्रचारादरम्यान सायंकाळी चित्रा वाघ यांच्या प्रचारसभेत दगड फेक करण्यात आली. चित्रा वाघ यांच्या प्रचार सभेत दगड फेक झाल्यानंतर त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. कोल्हापुरातील प्रचारसभेत दगड फेक झाल्याच्या घटनेचे त्यांनी ट्विट करुन समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारता, असं ट्विट करुन मी प्रचारार्थ सभेत मी बोलत असताना तिथे दगडं मारण्यात आली असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

सक्षम महिला, सक्षम देश

चित्रा वाघ यांनी कोल्हापुरमध्ये गेल्यानंतर त्यांनी अगोदर अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांनी अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यास बळ दे अशी प्रार्थना केली आणि प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी सक्षम महिला, सक्षम देश या पत्रकाचे प्रकाशन करुन कोल्हापूर उत्तरमधील महिलांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कोल्हापुरातील प्रचारादरम्यान भाजपा नगरसेवक किरण शिराळे यांनी शुक्रवार पेठेत आयोजित “मिसळ पे चर्चा” कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अरुंधती महाडिक आणि महिला उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

Raj Thackeray Nitin Gadkari meet : राज ठाकरे-नितीन गडकरींच्या भेटीवर भाजप नेते म्हणतात हिंदुत्वाबाबत ठोस भूमिका घेतल्याने…

राज ठाकरेंच्या भाषणानं वारं बदललं, नारायण राणे, विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह भाजप नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी, “शिवतीर्थ”वरील भेटीत युतीची चर्चा?