AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी, “शिवतीर्थ”वरील भेटीत युतीची चर्चा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर पोहोचले आाहेत. कालच राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर जोरादार निशाणा साधला असताना या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आज भाजप नेत्यांनीही दिवसभर राज ठाकरेंचा गोडवा गायला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी, शिवतीर्थवरील भेटीत युतीची चर्चा?
नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीलाImage Credit source: tv9
| Updated on: Apr 03, 2022 | 10:34 PM
Share

मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या  (Raj Thackeray) भेटीला थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर पोहोचले आाहेत. कालच राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर जोरादार निशाणा साधला असताना या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आज भाजप नेत्यांनीही दिवसभर राज ठाकरेंचा गोडवा गायला आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणानंतर मनसे-भाजपच्या युतीच्या (Mns Bjp Alliance) जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे कालच्या सभेत राज ठाकरेंनी भाजपवर एकही शब्द टिका केली नाही. तर महाविकास आघाडीवर राज ठाकरे गारा बरसल्यासारखे एकामागोमाग एक बरसत होते. त्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरेंचा समाचार घेत सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा अजित पवारांकडे वळवला. त्यानंतर त्यांनी मशीदीवरील भोंग्यांवरून जोरदार बॅटिंग सुरू केली.

कोणताही नियोजित दौरा नव्हता

नितीन गडकरींच्या भेटीमागील टायमिंग याबाबत आता जोरदार चर्चा आहे. हा कुठलाही नियोजित दौरा नव्हता. राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक करण्यासाठी नितीन गडकरी थेट शिवतीर्थावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. आज भाजप नेते दिवसभर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ वक्तव्य करत होते. अगदी नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते मोहीत कंबोज यांच्यापर्यंत सर्व नेते राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक करताना दिसून आले. त्यामुळे ही साखळी जोडली जातेय का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कालच राज ठाकरेंचं भाषण काल भाषण संपल्यापासून सुरू आहे. त्यामुळे आता गडकरींच्या भेटीनंतर युतीची प्रक्रिया सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रतली राजकीय परिस्थिती आणि शिवसेना, महाविकास आघाडीवर टीका केल्यावर सहाजिकच या भेटीत राजकीय चर्चा होणार. मात्र नितीन गडकरी आणि राज ठाकरेंचं चांगले संबंध आहेत. मात्र या भेटीवरून लगेच अनुमान काढू नये. जे काही होईल ते पक्षीय पातळीवर होईल. मात्र राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि भाजपची भूमिका एक असल्याने ही प्रक्रिया सुलभ झाली आहे, असे सूचक विधान प्रवीण दरेकरांनी केलं आहे. असा एखादा नेता जर हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठोस उभा राहत असेल तर नकारात्मकता घेण्याचे कारण नाही, असेही संकेत दरेकारांनी दिले आहेत.

यूपीएत काय सुरु आहे यात लक्ष देऊ नका, चंद्रकांतदादा जनतेच्या प्रश्नावर, महागाई,बेरोजगारी वर बोला : नाना पटोले

Sharad Pawar : देशात जाती-धर्माच्या नावाखाली दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा पुन्हा मोठा आरोप

Ajit Pawar : सरळ देत नसतील तर बोट वाकडं करावं लागतं, टनामागे 10 रुपये देण्यावरून अजित पवारांचा कारखान्यांना इशारा

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.