AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची 250 जणांची यादी तयार, पहिल्या यादीत महाराष्ट्रातली 21 नावं?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास 250 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. या यादीत अनेक आश्चर्यचकीत करणाऱ्या नावांचा समावेश असणार आहे. अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याचा निर्णय भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी निवडणूक […]

भाजपची 250 जणांची यादी तयार, पहिल्या यादीत महाराष्ट्रातली 21 नावं?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास 250 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. या यादीत अनेक आश्चर्यचकीत करणाऱ्या नावांचा समावेश असणार आहे. अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याचा निर्णय भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी निवडणूक लढणार का याबाबतही सस्पेन्स आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी. सी. खंडुरी आणि बी. एस. कोश्यारी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्याऐवजी तरुणांना संधी द्यावी, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र आणि करिया मुंडा यांचाही निवडणूक लढण्याचा मूड नसल्याचं कळतंय. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार हे देखील निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी सध्या 91 वर्षांचे आहेत. मुरली मनोहर जोशींसोबत त्यांचाही समावेश 2014 मध्ये मार्गदर्शक मंडळात करण्यात आला होता. तेव्हाच ठरवण्यात आलं होतं, की 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नेत्याला जबाबदारी दिली जाणार नाही.

अडवाणी यांनी आतापर्यंत गुजरातमधीन गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. देशाचं गृहमंत्रीपद आणि उपपंतप्रधानपदही त्यांनी भूषवण्यासोबतच सलग सहा वेळा निवडणूक जिंकण्याचा त्यांचा विक्रम आहे. गांधीनगरमधून सलग दोन वेळा ते निवडणूक जिंकले आहेत. 1984 मध्ये भाजपला दोन जागांवरुन 180 जागांवर पोहोचवण्यात अडवाणी यांचा मोलाचा वाटा आहे. पण सध्या ते सक्रिय राजकारणात दिसत नाहीत. अडवाणी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध केला होता. तेव्हापासून ते भाजपातून वेगळे पडल्याचं चित्र आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरचे खासदार मुरली मनोहर जोशी यांनाही पुन्हा तिकीट दिलं जाईल याची शाश्वती नाही. जोशी यांच्या समर्थकांनी प्रचाराचीही सुरुवात केली होती. पण अजून तिकीट निश्चित नसल्याचं सांगत त्यांनी समर्थकांना समज दिल्याचीही माहिती होती.

कोणत्या राज्यातील किती जागांची यादी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी संसदीय बोर्डाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 35, महाराष्ट्रातील 21, बिहारमधील सर्व 17, ओदिशा, झारखंड, छत्तीसगडच्या 5, जम्मू काश्मीरच्या सर्व 6, राजस्थान, पश्चिम बंगालमधील जवळपास 27, केरळ, तामिळनाडू, आसाम, त्रिपुरा, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सर्व उमेदवारांची नावं जाहीर होऊ शकतात.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी 25 जागा भाजप आणि 23 जागा शिवसेना लढणार आहे. तर बिहारमध्ये एकूण 40 जागा आहेत. त्यापैकी भाजप-जेडीयू 17-17 आणि रामविलास पासवान यांच्या पक्षाला सहा जागा सोडण्यात आल्या आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.