AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडेंची नाराजी दूर झाली? कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवातच गोपीनाथ गडावरुन, पंकजा काय करणार?

रेल्वे राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेतून बीड जिल्हा वगळण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र, आता कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावरुन निघणार आहे. इतकंच नाही तर या यात्रेला पंकजा मुंडे हिरवा झेंडा दाखवणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे.

पंकजा मुंडेंची नाराजी दूर झाली? कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवातच गोपीनाथ गडावरुन, पंकजा काय करणार?
केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप नेत्या पंकजा मुंडे
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 6:41 PM
Share

बीड : राजधानी दिल्लीत झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत नवनियुक्ती केंद्र मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मात्र, कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेतून बीड जिल्हा वगळण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र, आता कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ गडावरुन निघणार आहे. इतकंच नाही तर या यात्रेला पंकजा मुंडे हिरवा झेंडा दाखवणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे. (Bhagwat Karad’s JanAashirwad Yatra will start from Gopinath Gadh)

16 ऑगस्टला केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला परळीच्या गोपीनाथ गडावरुन सुरुवात होणार आहे. पंकजा मुंडे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानं मागील काही दिवसांपासून मुंडे समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कराड यांची ही यात्रा बीडमध्ये येणार नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता स्वतः पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या यात्रेस सुरुवात होणार असल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. भागवत कराड यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर लक्ष राहणार आहे.

पंकजा मुंडेंच्या हस्ते मंत्री भागवत कराड यांचा सत्कार

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर नवे केंद्रीय मंत्री डॅा भागवत कराड यांचा सत्कार केला. प्रीतम मुंडेंना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज होत्या. मात्र पंकजा मुंडे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान, भागवत कराड यांचा सत्कार केल्याचा फोटो समोर आला आहे. प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रिपद मिळाल्यानं पंकजा समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांच्या वरळी इथल्या निवासस्थानी धाव घेतली होती. मुंबईत मुंडे समर्थकांचा छोटेखानी मेळावा झाला होता. त्यावेळी मुंडे भगिनींची नाराजी दिसून आली होती. या काळात केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची भेट पंकजा मुंडेंनी वारंवार टाळल्याची चर्चा होती. मात्र कालच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंच्या हस्तेच भागवत कराड यांचा सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या :

“मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते” पंकजांच्या भेटीनंतर भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंची आठवण, ट्विटची जोरदार चर्चा

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड बीड जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा करणार नाहीत! नेमकं कारण काय?

Bhagwat Karad’s JanAashirwad Yatra will start from Gopinath Gadh

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....