AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya | ठाकरे सरकार कोसळलं, एकनाथ सरकार आलं, तक्रारी मागे घेणार का? किरीट सोमय्यांनी स्पष्ट सांगितलं…

एकनाथ शिंदे सरकारचं अभिनंदन करतानाच किरीट सोमय्या यांनी आपण आधी केलेल्या तक्रारींपासून माघारी फिरणार नाही, असं ठामपणे सांगितलं.

Kirit Somaiya | ठाकरे सरकार कोसळलं, एकनाथ सरकार आलं, तक्रारी मागे घेणार का? किरीट सोमय्यांनी स्पष्ट सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 07, 2022 | 4:29 PM
Share

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार हे माफिया सरकार आहे. सरकारमधील एक एक भ्रष्टाचार उघडा पाडू, असा इशारा देणाऱ्या किरीट सोमय्यांची सध्याची प्रतिक्रिया काय आहे, याबाबत अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. ठाकरे सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केलेल्या तक्रारी मागे घेतल्या जाणार का, हा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. भाजप खासदार सोमय्या यांनी या प्रश्नांचं आज स्पष्टच उत्तर दिलं. सरकार बदललं तरीही माझ्या तक्रारी मी मागे घेणार नाही. मंत्री असले तरीही अनिल परब (Anil Parab) यांचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाणारच असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकृतरित्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेऊन शिंदे यांचं अभिनंदन केलं.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढताना किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राला माफिया मुक्त करण्याचा मागील अडीच वर्षांपासून आमचा संघर्ष होता. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने तो पूर्ण झाला. याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. एकनाथांना मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये पाहून मला आनंद झाला. मात्र अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातील पुढील कारवाई सुरु ठेवावी, अशी विनंती मी त्यांना केल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

‘परब यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’

एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतरही परब यांच्याविरोधातील कारवाई सुरुच ठेवावी, अशी विनंती सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ते म्हणाले, ‘ अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट बेकायदेशीर आहे. तोडण्याचे आदेश 31 जानेवारीला दिले आहेत. स्वतःला पर्यावरणवादी म्हणणाऱ्या ठाकरेंनी ते बेकायदेशीरपणे थांबवलं. तो रिसॉर्ट ताबडतोब थांबवण्याची कारवाई पर्यावरण मंत्रालय आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु करावी, अशी विनंती मी केली आहे. अनिल परबनी बेनामी पद्धतीने रिसॉर्ट बनवला असेल तर पाडलाच पाहिजे, अशी भूमिका सोमय्यांनी मांडली.

‘सोमय्या मागे हटणार नाही’

एकनाथ शिंदे सरकारचं अभिनंदन करतानाच किरीट सोमय्या यांनी आपण आधी केलेल्या तक्रारींपासून माघारी फिरणार नाही, असं ठामपणे सांगितलं. ते म्हणाले, ‘ एकिककडे माफिया मुख्यमंत्री आहे तर दुसरीकडे जनसामान्यांची सेवा करणारे रिक्षावाले मुख्यमंत्री आहेत. राऊत मशीन वॉसिंगमशीनवरून बोलायचे. महाराष्ट्राच्या जनतेनी उद्धव ठाकरेंची धुलाई केली. मुंबई हायकोर्टाने आणखी दोन तमाचे मारले. संजय राऊतांनी 15 पानी पत्र लिहिलं होतं. जे घोटाळे किरीट सोमय्याने बाहेर काढले आहेत. त्यातले कोणतेही घोटाळे सोमय्या मागे घेणार नाहीत. न्यायालयात जे खटले सुरु आहेत, तिथं कोर्याचा निर्णय मान्य केला जाईल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.