सामनात अग्रलेख आला याचा अर्थ घाव वर्मी बसला, देवेंद्र फडणवीसांचा टोला

| Updated on: Mar 11, 2021 | 8:10 AM

हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे, हे स्पष्ट झालं आहे," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  (Devendra Fadnavis on samana editorial)

सामनात अग्रलेख आला याचा अर्थ घाव वर्मी बसला, देवेंद्र फडणवीसांचा टोला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
Follow us on

नागपूर : “नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना टोचणारे आणि बोचणारे मुद्दे आम्ही उचलले. जनहिताचे मुद्दे उचलले ही आमची जबाबदारी आहे, तशीच वृत्तपत्राचीही आहे. आम्ही कोवीड, शेतकरी, गरिबांबाबत बोललो. हे त्यांना दिसले नाही. त्याबद्दल सामनात अग्रलेख आला. त्यामुळे घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आलं,” असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Devendra Fadnavis on samana editorial and budget session)

विजेच्या मुद्द्यावर सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार

“अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने आम्ही वीज जोडणी कापणार नाही. त्याला स्थगिती दिली आहे, असे सांगितले होते. पण शेवटच्या दिवशी अतिशय थातूरमातूर निवदेन करुन पुन्हा एकदा वीज जोडणी कापणी सुरु केलं आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. तसेच यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे, हे स्पष्ट झालं आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“राज्य सरकार लबाडी करत आहे. पुढच्या तीन महिन्यात सरकार येईल का नाही? याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बोलतील,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

“सरकारला अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो”

“या अधिवेशनात काहीही मिळालं नाही. सर्वात जास्त विदर्भ आणि मराठवाड्याची निराशा झाली आहे. कोरोना वाढतोय, सरकारचं याकडे लक्ष नाही, सरकारचं नियोजन नाही. अधिवेशनाच्या आधी कोरोना वाढतो, अधिवेशनात कमी होतो आणि अधिवेशनानंतर पुन्हा वाढतो, सरकारला अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

“कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना सरकारकडून दिसत नाही. लॅाकडाऊन ही प्रभावी योजना नाही. विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडणे आणि सरकारच्या चुका दाखवणे हे आमचं काम आहे आणि ते काम आम्ही केलं,” असेही फडणवीस म्हणाले.  (Devendra Fadnavis on samana editorial and budget session)

संबंधित बातम्या : 

फडणवीसांनी अधिवेशन गाजवल्याच्या चर्चा मात्र राऊत म्हणतात, ‘विरोधी पक्ष काय करतोय?’

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ, अजित पवारांची पुन्हा फडणवीसांना साद!

राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गेल्या 5 वर्षापेक्षा अधिक चांगली, गुन्ह्याचा दर कमी, शिक्षेचा जास्त : गृहमंत्री देशमुख