हर्षवर्धन पाटील कन्येसह राज्यपालांच्या भेटीला, अंकिता पाटील म्हणतात…

अनिश बेंद्रे

|

Updated on: Aug 18, 2020 | 3:38 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रशासन व राजकारणाचा असलेला प्रदीर्घ अनुभव यावेळी त्यांच्या बोलण्यातून व संकल्पनेतून जाणवला, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले

हर्षवर्धन पाटील कन्येसह राज्यपालांच्या भेटीला, अंकिता पाटील म्हणतात...
Follow us

इंदापूर: भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. पुण्यात झालेल्या या भेटीच्या वेळी हर्षवर्धन यांच्या कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटीलही उपस्थित होत्या. भेटीमुळे अधिक जिद्दीने काम करण्यास विचारांची नवीन ऊर्जा मिळाल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले. (BJP Leader Harshvardhan Patil Daughter Ankita Patil meets Governor Bhagatsingh Koshyari)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रशासन व राजकारणाचा असलेला प्रदीर्घ अनुभव यावेळी त्यांच्या बोलण्यातून व संकल्पनेतून जाणवला, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. सोमवारी झालेल्या चर्चेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवर संवाद साधला.

युवा पिढीने राजकारणात सक्रीय होऊन जनसेवा करावी यासाठी ते आग्रही दिसले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे सकारात्मक विचारांची मोठी शिदोरी असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार

राज्यपाल हे प्रचंड अनुभवी व या वयातही जिद्दी असल्याचे जाणवले, त्यांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्राला निश्चितपणे होईल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीही सहभाग घेतला. राज्यपालांशी झालेल्या भेटीमुळे अधिक जिद्दीने काम करण्यासाठी विचारांची नवीन ऊर्जा मिळाल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले.

नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. गोवा राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली झाल्याने कोश्यारींकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली मेघालयच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर

(BJP Leader Harshvardhan Patil Daughter Ankita Patil meets Governor Bhagatsingh Koshyari)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI