AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्णय घेताना समाजाचा विचार करा, स्वार्थ पाहू नका; प्रसाद लाड यांचे संभाजीराजेंना आवाहन

संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं म्हणून त्यांना राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं. (bjp leader prasad lad reaction on Sambhaji Chhatrapati's political leaders visit)

निर्णय घेताना समाजाचा विचार करा, स्वार्थ पाहू नका; प्रसाद लाड यांचे संभाजीराजेंना आवाहन
संभाजीराजे छत्रपती
| Updated on: May 28, 2021 | 4:09 PM
Share

रत्नागिरी: संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाचं नेतृत्व करावं म्हणून त्यांना राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं. त्यांचा सन्मान ठेवला गेला. संभाजीराजेंनी मराठा समाजाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून ते योग्य निर्णय घेतील. निर्णय घेताना मराठा समाजाचा विचार करावा. स्वार्थ पाहू नका, असं आवाहन भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. (bjp leader prasad lad reaction on Sambhaji Chhatrapati’s political leaders visit)

प्रसाद लाड यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना हे आवाहन केलं आहे. संभाजी छत्रपती यांना राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं ते मराठा समाजाचं नेतृत्व करावं म्हणून. त्यांचा सन्मान ठेवला गेला. त्यामुळे त्यांनी आता मराठा समाजाबाबतची भूमिका स्पष्ट करावी. त्यांची भूमिका काही दिवसात बदलते. ते योग्य नाही. त्यांनी समाजाच्या हिताची भूमिका समोर न्यावी. ते छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून योग्य निर्णय घेतील. पण निर्णय घेताना मराठा समाजाचा विचार करा, स्वार्थ पाहू नका, असं आवाहन लाड यांनी केलं.

तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य

संभाजी छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे. तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वांना भेटा, असंही ते म्हणाले.

नो कमेंट

संभाजीराजे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांबाबतही त्यांना छेडण्यात आलं. त्यावर संभाजी छत्रपती यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे मी त्यावर आत्ताच बोलणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निलेश राणे काय म्हणाले?

दरम्यान, भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनीही ट्विट करून संभाजी छत्रपतींवर टीका केली होती. संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं. पण, मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

मेटेंची टीका

संभाजीराजे आणि पवारांच्या भेटीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली होती. लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकतो. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही. मराठा आरक्षण, नोकऱ्या आणि सारथी या महत्वाच्या विषयांवरची चर्चा 10 मिनिटांत कशी पूर्ण झाली? पण आता संभाजीराजे चर्चा सकारात्मक झाली, असे म्हणत असतील तर पुढे काय होते ते बघू, असं मेटे म्हणाले होते. त्यानंतर राणेंनी टीका केल्याने संभाजीराजे आणि भाजपमध्ये मतभेद वाढत असल्याचं दिसून येत आहे. (bjp leader prasad lad reaction on Sambhaji Chhatrapati’s political leaders visit)

संबंधित बातम्या:

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

मराठा आरक्षण लढ्याचे रणशिंग कोल्हापुरमधून फुंकले जाणार, संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन; संभाजीराजे छत्रपती कडाडले

(bjp leader prasad lad reaction on Sambhaji Chhatrapati’s political leaders visit)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.