आगे आगे देखो, होता है क्या, शरद पवार-अमित शाह भेटीवर भाजपच्या बड्या नेत्याचे रोखठोक वक्तव्य

अमित शाह आणि शरद पवारांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चलबिचल वाढली आहे. | Sharad Pawar Amit Shah

आगे आगे देखो, होता है क्या, शरद पवार-अमित शाह भेटीवर भाजपच्या बड्या नेत्याचे रोखठोक वक्तव्य
शरद पवार आणि अमित शाह
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 12:11 PM

पंढरपूर: महाविकासआघाडीचा प्रमुख आधारस्तंभ असलेले शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चलबिचल वाढली आहे. अशा परिस्थितीत आता भाजपचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी नवे वक्तव्य करुन संभ्रम आणखीनच वाढवला आहे. (BJP leader Ram Shinde on Sharad Pawar and Amit Shah meet)

राम शिंदे यांनी मंगळवारी पंढरपुरात ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांना अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया दिली.

यावेळी त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. या निवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज भाजपचे राज्यातील बडे नेते पंढरपुरात येणार आहेत. पंढरपूरची पोटनिवडणूक म्हणजे ठाकरे सरकारसाठी लिटमस टेस्ट असेल, असे वक्तव्य राम शिंदे यांनी केले.

शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन

राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मी शक्यता व्यक्त करण्याइतका मोठा नेता नाही: चंद्रकांत पाटील

यूपीएच्या अध्यक्षपदावरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक वादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. संजय राऊत हे चंद्र, सूर्य किंवा मंगळ अशा कोणत्याही विषयावर भाष्य करु शकतात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कालप्रमाणे शरद पवार आणि अमित शाह भेटीवर भाष्य करण्यास नकार दिला. तशा गोष्टी घडल्याच तर तुम्हाला आधी कळेल, असे मी बोललो होता. परंतु, कोणत्याही शक्यता व्यक्त करण्याइतका मी मोठा माणूस नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. संबंधित बातम्या: 

शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन

पवार-शहा भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा; संजय राऊतांचं ट्विट

अमितजींचा निर्णय मान्य, काही ठरलंच तर पहाटेच्या शपथविधीसारखं झाल्यावर कळेल: चंद्रकांत पाटील

(BJP leader Ram Shinde on Sharad Pawar and Amit Shah meet)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.