भाजपच्या बहुमताची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या कट्टर दुश्मनाकडे!

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला सत्तास्थापना करणे अवघड (Bjp floor test responsibility narayan rane) झाले. मात्र आता बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने आता नवी खेळी खेळली आहे.

भाजपच्या बहुमताची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या कट्टर दुश्मनाकडे!

मुंबई : अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळत (Bjp floor test responsibility narayan rane) आहे. अजित पवारांनी काल (23 नोव्हेंबर) पहाटे भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला सत्तास्थापना करणे अवघड (Bjp floor test responsibility narayan rane) झाले. मात्र आता बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने आता नवी खेळी खेळली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर दुश्मन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर बहुमताची जबाबदारी दिली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली (Bjp floor test responsibility narayan rane) आहे.

भाजप कोट्यातून राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यापूर्वी शिवसेना आणि काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे या दोन्ही पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते आणि आमदारांसोबत नारायण राणेंचे वैयक्तिक संबंध असल्याचे अनेकदा दिसलं आहे. त्यामुळे भाजपने राणेंवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना संपर्क साधण्याची जबाबदारी दिली आहे, असं म्हटलं जात आहे.

“सर्व पक्षात माझे मित्र आहेत. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण यांना सोडून इतर सर्व माझे मित्र आहेत.” असे वादग्रस्त वक्तव्य राणेंनी 2017 ला काँग्रेस सोडताना केलं होतं. आताही अनेकदा ते प्रसारमाध्यमांसमोर हे बोलतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात बनवलेल्या सरकारसाठी बहुमताचा आकड्यांची जुळवाजुळव करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हेच काम करणार आहेत.

राज्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर नारायण राणे म्हणाले, “भाजप सरकार तयार करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी मी सर्व प्रयत्न करेन. साम, दाम, दंड, भेद हे सर्व मला शिवसेनेनं शिकवलं आहे.”

“भाजपकडे 105 आमदार आहेत. आम्हाला अजून 40 ते 45 आमदारांचे समर्थन पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे,” असं नारायण राणेंनी यापूर्वीही सांगितले होते.

शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने राणेंना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं होतं. त्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे.  विधानसभा निवडणुकांदरम्यान नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करत भाजपमध्ये प्रवेश (Bjp floor test responsibility narayan rane) केला होता.

नारायण राणेंची राजकीय कारकीर्दीला शिवसेनेतून सुरुवात झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 मध्ये त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या जागी नारायण राणेंना बसवले. पण नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यानंतर नारायण राणेंना जुलै 2005 मधून पक्षातून (Bjp floor test responsibility narayan rane) काढले.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये नारायण राणेंना मंत्रीपद मिळाले. 2008 मध्ये काँग्रेस नेतृत्वांच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकले होते. पण माफी मागितल्यानंतर त्यांना पक्षात पुन्हा घेतले.

यानंतर 2017 मध्ये नारायण राणेंनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत स्वत:च्या नवीन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर जवळचे संबध असल्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. शिवसेनेच्या विरोधामुळे नारायण यांच्या पक्षाला भाजपमध्ये विलिन करण्यासाठी वेळ लागला. पण देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानंतर विधानसभा निवडणुकांदरम्यान राणेंच्या पक्षाचे विलिनकरण भाजपमध्ये करण्यात आले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI