भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रवादीवर आरोप करत उद्धव ठाकरेंना डिवचले

एकनाथ शिंदेच्या बंडखोरीचा फायदा भाजपला झाल आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबरस्दत झटका बसला आहे.

भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रवादीवर आरोप करत उद्धव ठाकरेंना डिवचले
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 9:51 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर नवे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलेय. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पहिल्याच निवडणुका पार पडला. ग्राम पंचायत निवडणुकीत(Gram Panchayat election results) भाजपने पहिले स्थान मिळवले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडखोरीचा फायदा भाजपला झाल आहे. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबरस्दत झटका बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयामुले भाजप नेत्यांचा आत्मविश्वासही प्रचंड वाढला आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेले शिल्लक सेना असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर होती. आता शिवसेना फुटीनंतर, उद्धव ठाकरेंना गावागावातही धक्का बसला आहे.

शिवसेना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना पाचव्या क्रमांकावर केलीय. त्यावरुन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.

पक्ष सांभाळला गेला पाहिजे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्षाची काय वाताहत होते हे आजच्या निकालावरून पाहायला मिळत आहे असा टोला गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

तर, भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा घाट घातल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.