शिवसेनेला भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता : रावसाहेब दानवे

"शिवसेनेला मुख्यमंत्री देण्याचा शब्द भाजपच्या कोणत्याही नेत्याने दिलेला  नाही. लोकसभेपूर्वी मातोश्रीवरील बैठकीत मी स्वत: होतो," असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve on Cm Post) म्हणाले. 

शिवसेनेला भाजप नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता : रावसाहेब दानवे

नांदेड : महाराष्ट्रात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित (Raosaheb Danve on Cm Post) झालं आहे. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन झालेल्या राड्यावर नुकतंच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. “शिवसेनेला मुख्यमंत्री देण्याचा शब्द भाजपच्या कोणत्याही नेत्याने दिलेला  नाही. लोकसभेपूर्वी मातोश्रीवरील बैठकीत मी स्वत: होतो,” असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve on Cm Post) म्हणाले. यामुळे भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे दिसून येत (Raosaheb Danve on Cm Post) आहे.

“लोकसभा निवडणुकांपूर्वी मी मातोश्रीवर बैठकीसाठी गेलो होतो. त्यावेळी मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपच्या कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द शिवसेनेला दिला नव्हता. त्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेलाही मी होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल असं बोलले होते. मात्र समान वाटपामध्ये मुख्यमंत्रीपद नाही. तर पदाचे समान वाटप होईल. त्यावेळी त्यांनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असा कोणताही उल्लेख केला नव्हता,” असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले (Raosaheb Danve on Cm Post) आहे.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेने विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं अशी भूमिका बोलून दाखवली. मात्र या मागणीला भाजपने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. यानंतर आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता स्थापन करणार असल्याचे बोललं जात (Raosaheb Danve on Cm Post) आहे.

सत्तासंघर्ष कसा चालला?

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपने शिवसेनेची इच्छा नसल्याचं रविवारी (10 नोव्हेंबर 2019) सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला आवताण दिलं होतं.

शिवसेनेने सोमवारी रात्री (11 नोव्हेंबर 2019) राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागली. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या बैठकांचं सत्र सुरु होतं. त्यातच झालेल्या दिरंगाईमुळे शिवसेनेला केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रं राज्यपालांकडे सादर करता आली नाहीत. आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला.

राज्यपालांनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला मंगळवारी रात्री (12 नोव्हेंबर 2019) 8.30 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्याआधी राष्ट्रवादीनेही मुदतवाढ मागितली. परंतु राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही वेळ वाढवून देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने मंगळवार 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *