AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंनी दावे फेटाळताच महाजन म्हणाले, माझ्याकडे नाथाभाऊंची क्लिप; काय आहे प्रकरण?

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत एक विधान केलं. त्यावरून आता महाजन-खडसे आमनेसामने आलेत....

खडसेंनी दावे फेटाळताच महाजन म्हणाले, माझ्याकडे नाथाभाऊंची क्लिप; काय आहे प्रकरण?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 03, 2022 | 3:03 PM
Share

गौतम बैसाने, TV9 मराठी, प्रतिनिधी, धुळे : भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत एक विधान केलं. ‘मिटवण्याच्या’ मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलंय. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यावर खडसेंनी प्रत्युत्तर देत महाजनांचे दावे खोडून काढले. खडसेंच्या उत्तरावर आता गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा आता त्यावर प्रत्त्युत्तर दिलंय. खडसेंनी फडणवीसांच्या कानात काय सांगितलं याची क्लिप आपल्याकडे उपलब्ध असल्याचं महाजन (Girish Mahajan) म्हणालेत.

खडसेंना इशारा

अधिक बोलायला लावू नये, असं म्हणत महाजनांनी खडसेंना इशारा दिलाय. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या कानात काय सांगितलं याची क्लिप उपलब्ध आहे. त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, असं महाजन म्हणालेत.

महाजनांचा दावा काय?

गिरीश महाजन यांनी खडसेंबाबत एक विधान केलंय. मी आणि देवेंद्र फडणवीस बसलो होतो.तिथे एकनाथ खडसे आले आणि त्यांनी म्हटलं की आपण तिघं बसू. जे काही आहे ते सगळं मिटवून घेऊ… आम्ही बसलो तिथे खूप गर्दी होती. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे? हे स्पष्टपणे कळू शकलं नाही. तिथं त्यांना विचारता आलं नाही की नेमकं काय मिटवायचंय ते”, असा दावा महाजनांनी केला.

खडसेंचं उत्तर

महाजनांच्या दाव्यावर खडसेंनी उत्तर दिलंय. त्या दिवशी बोलताना मिटून टाका, मी असं काही बोललोच नाही, असं खडसे म्हणालेत. आता मिटवायचं राहिलंय तरी काय? सर्वप्रकारे तर त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीची चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशी सुरू आहे. या सर्व चौकशींना मी समर्थपणे सामोरं जाणार आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय