टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे ?

अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला. Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope

टोपेंनी जालन्यासाठी मनमानी केल्याचा भातखळकरांचा आरोप,  महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री की जालन्याचे ?
अतुल भातखळकर, राजेश टोपे
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 12:58 PM

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होतेय. दुसरीकडे लसीकरणाच्या मुद्यावरुन राजकारण देखील तापलेलं आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जालना जिल्ह्याला जास्त लसी मिळाल्याच्या मुद्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे अतुल भातखळकर यांनी यावेळी राजेश टोपे जालन्याचे आरोग्यमंत्री आहेत की महाराष्ट्राचे?,असा प्रश्न उपस्थित केला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope on extra corona vaccine allocation Jalna)

राजेश टोपेंवर निशाणा

केंद्राकडून मिळालेल्या 26.77 लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?, अशा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारवर मनमानीचा आरोप

अतुल भातखळकर यांनी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधताना महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला 17 हजार डोस ऐवजी 60 हजार डोस अधिक देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे? आहात असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राला 26.77 लाख लसी

केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 26.77 लाख लसींचं साठा दिला आहे. या लसींचं मनमानी पद्धतीनं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावरुनही राज्य सरकारवर निशाणा

ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

भाजपला ‘ओबीसीं’चा नारा देण्याची वेळ का आलीय?; वाचा राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

(BJP MLA Atul Bhatkhalkar slams Rajesh Tope on extra corona vaccine allocation Jalna)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.