इकडे जयंत पाटील म्हणाले, भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात, तिकडे जयकुमार गोरे पवारांच्या भेटीला

सचिन पाटील

|

Updated on: Nov 16, 2019 | 2:06 PM

भाजपचे काही आमदार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (BJP MLA in touch with NCP) यांनी केला.

इकडे जयंत पाटील म्हणाले, भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात, तिकडे जयकुमार गोरे पवारांच्या भेटीला
Follow us

पुणे : भाजपचे काही आमदार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (BJP MLA in touch with NCP) यांनी केला. टीव्ही 9 मराठीशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपचे काही आमदार संपर्कात (BJP MLA in touch with NCP) असल्याचं म्हटलं. जयंत पाटलांची प्रतिक्रिया येत असतानाच, तिकडे भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला गेल्याने, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जयकुमार गोरे यांनी शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काही दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांनी भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट का घेतली हे अद्याप अस्पष्ट आहे.

जयंत पाटील यांचा दावा

दुसरीकडे जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना, भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचं म्हटलं. “भाजपचे काही आमदार जे राष्ट्रवादीतून तिकडे गेले, जे दुखावले आहेत किंवा पराभूत झाले आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत. गेल्या 10 ते 15  दिवसांपासून ते संपर्क करत आहेत. ते मतं व्यक्त करत आहेत की आमच्याकडून चूक झाली, आम्ही जर असं केलं नसतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यापेक्षा जास्त संख्येने आले असते, असं खासगीमध्ये सर्वजण कबूल करत आहेत.  आमच्यासोबत येण्यासाठी तयार आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.

आम्हाला सोडून गेलेल्यांचं पुन्हा मनपरिवर्तन होईल. त्यांना पुन्हा घ्यायचं की नाही, याबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं जयंत पाटील म्हणाले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेले 6 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं.

लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते, विद्यमान आमदार भाजपमध्ये गेले होते. याशिवाय अनेकांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या 4 जणांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेत गेलेल्या एकाच आमदाराचा विजय झाला.

राष्ट्रवादीतून आलेले भाजपचे तिकीटधारक

बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर – विजयी
राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद – विजयी
नमिता मुंदडा – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड विजयी
शिवेंद्रराजे – सातारा – विजयी
राष्ट्रवादीतून आलेले शिवसेनेचे तिकीटधारक (Incoming Outgoing for Candidature)

भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना – गुहागर, रत्नागिरी – विजयी
पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना – शहापूर, ठाणे – पराभूत
दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत
जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना – बीड, बीड – पराभूत
रश्मी बागल – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – करमाळा, सोलापूर – पराभूत
शेखर गोरे – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – माण, सातारा – पराभूत


Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI