विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली (BJP MLA Kalidas Kolambkar takes oath as Protem Speaker) आहे.

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती

मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार अवघ्या 79 तासांत (BJP MLA Kalidas Kolambkar takes oath as Protem Speaker) कोसळलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली (BJP MLA Kalidas Kolambkar takes oath as Protem Speaker) आहे. कालिदास कोळंबकर यांनी आज (26 नोव्हेंबर) संध्याकाळी 5.30 च्या सुमारास राजभवनात पद आणि गोपनियतेची शपथ (BJP MLA Kalidas Kolambkar takes oath as Protem Speaker) घेतली.

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर आमदार कालिदास कोळंबकर माध्यमांशी बातचीत करताना म्हणाले. “उद्या सकाळी 8 वाजता सदनाची कार्यवाही सुरु होईल. सकाळी 8 नंतर सर्व आमदारांचा शपथविधी पार पडेल. तसेच कोळंबकरांच्या देखरेखीत बहुमत चाचणी पार पडणार आहे.  मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत ज्या पद्धतीने कारभार होतो. तशाच पद्धतीने विधानभवनाची कारभार पार पाडणार,” अशी प्रतिक्रिया कोळंबकरांनी (BJP MLA Kalidas Kolambkar takes oath as Protem Speaker) दिली.

दरम्यान उद्या (27 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता विशेष अधिवेशन बोलण्यात आले आहे. राज्यपालांनी हे विशेष अधिवेशन बोलवले आहे.

हंगामी अध्यक्षपदासाठी 17 विधानसभा सदस्यांची नावं सचिवालयाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सूपूर्द करण्यात आली होती. यात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सर्वाधिक वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, के सी पाडवी, कालिदास कोळंबकर, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गोवर्धन शर्मा, हितेंद्र ठाकूर, प्रकाश भारसाखळे, मंगलप्रभात लोढा, बबनराव शिंदे यांच्या नावाचा समावेश होता.

या सर्व नावांमधून भाजप आमदार कालिदास कोळंबकरांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रोटेम स्पीकर कोण असतो?

प्रोटेम स्पीकर या शब्दात प्रोटेम (Pro-tem) हा शब्द लॅटिन भाषेतील प्रो टॅम्पोर या शब्दाचं संक्षिप्त रुप आहे. त्याचा अर्थ तात्पुरत्या स्वरुपाचा असा आहे. प्रोटेम स्पीकर निवडणुकीनंतर पहिल्या सत्रात विधीमंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करुपर्यंत कामकाज पाहतात. त्यांचं कामाचं स्वरुप हंगामी असतं. विधानसभेत प्रोटेम स्‍पीकरची नेमणूक राज्यपाल करतात.

प्रोटेम स्पीकर हेच नवनियुक्त विधीमंडळ सदस्यांना (आमदार) शपथ देतात. त्यांच्याच देखरेखीखाली आमदारकीच्या शपथीची प्रक्रिया पूर्ण होते. जोपर्यंत आमदारांना शपथ दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना विधीमंडळांचा सदस्य मानले जात नाही. म्हणूनच सर्वात आधी आमदारांना शपथ दिली जाते.

कालिदास कोळंबकर कोण आहेत?

  • कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.
  • सलग आठवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
  • नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे.
  • नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
  • राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले.
  • त्यानंतर आता कालिदास कोळंबकरांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI