Police Bharti | मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम, पोलीस भरतीवरुन नितेश राणे आक्रमक

| Updated on: Sep 17, 2020 | 3:59 PM

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यात सरकार वारंवार मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे.

Police Bharti | मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम, पोलीस भरतीवरुन नितेश राणे आक्रमक
Nitesh Rane
Follow us on

मुंबई : ‘पोलीस भरती घेऊन सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे‘, (Nitesh Rane Criticize Government) असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर मेगा भरती काय मोठी भरती करावी, असंही ते म्हणाले (Nitesh Rane Criticize Government).

“मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यात सरकार वारंवार मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. ही स्थगिती सरकारने रद्द करावी आणि मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर मेगा भरती काय मोठी भरती करावी, सगळे स्वागतच करतील. जर जखमेवर मीठ चोळलं जात असेल तर विरोध होणारच”, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

“या पोलीस भरतीचा फटका हा मराठा तरुणांना बसणार आहे. ते रस्त्यावर ऊतरणार ते एल्गार पुकारणार, मनसे काय बोलते, ती त्यांची भूमिका यावर मी काय बोलणार आहे”, असंही ते म्हणाले (Nitesh Rane Criticize Government).

रोहन रॉयची चौकशी का केली नाही? – नितेश राणे

“रोहन राय हा मिस्टी बॉय आहे. त्याची चौकशी कोणत्याच यंत्रणेने केली नाही. तो कुठे आहे, कुणाला ठाऊक नाही. तो दिशा सालियानसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. ज्या दिवशी तिचा घात झाला त्यादिवशी रोहन हा तिथेच होता. मग त्याची चौकशी का केली नाही? कुणाला बिंग फुटण्याची भीती वाटते का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला”.

“मला जर कोणत्याही तपास यंत्रणांनी तपासासाठी बोलावलं, तर मी त्यांना माझ्याकडील माहिती देण्यासाठी तयार आहे. रोहन हा कुठेही असला तरी सीबीआयने त्याची चौकशी करणं, त्याचा जाब नोंदवणं हे गरजेचं आहे. त्याला इत्यंभूत माहिती आहे”

“राज्याच्या एका मंत्र्याचा सहभाग होता किंवा नाही, हे तपास यंत्रणांनी सिद्ध करावं. ते मोबाईल टॉवर लोकेशन का काढत नाहीत. 8 तारखेचं त्या वेळेचं मोबाईल टॉवर लोकेशन काढावं. ही माहिती मी द्यायला तयार आहे. त्यांना तर अधिकार आहेच ना, सीबीआयच्या तपासावर आजही आम्हाला विश्वास आहे, ते बरोबर तपास करतात. त्यांनी हा तपासही करावा सत्य समोर येईल”, असंही ते म्हणाले.

Nitesh Rane Criticize Government

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं, शिवसेना खासदाराची मागणी