एका हातात बंदूक दुसऱ्या हातात दारुचा ग्लास, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल

उत्तराखंडच्या खानपूर विधानसभेचे भाजप आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. प्रणव सिंह यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

एका हातात बंदूक दुसऱ्या हातात दारुचा ग्लास, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल


देहरादून : उत्तराखंडच्या खानपूर विधानसभेचे भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. प्रणव सिंह यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये आमदार दारुच्या नशेत गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यासोबत त्यांच्या हातात चार बंदुका आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रणव सिंहांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आमदार प्रणव सिंह व्हिडीओमध्ये उत्तराखंडबद्दल अपशब्द भाषेचा वापर करत आहेत. तसेच एका हातात बंदुक आणि दुसऱ्या हातात दारुचा ग्लास घेऊन नशेत नाचत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांचे समर्थकही नाचताना दिसत आहेत.

काहीदिवसांपूर्वीही प्रणव सिंह यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये प्रणव सिंह एका पत्रकारासोबत भांडताना दिसत होते. तसेच त्यांनी त्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. सिंह यांच्या अशा वादग्रस कारनाम्यामुळे पक्षाने त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे पक्षातील वरीष्ठांसोबतही त्यांचे वाद झाले होते.

या प्रकरणानंतर पत्रकाराने दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात प्रणव सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हे पाहून पक्षानेही त्यांना तीन महिन्यासाठी पक्षातील सदस्या पदावरुन त्यांना निलंबित केले होते.

आमदार प्रणव सिंह यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे भाजपवर विरोधी पक्षही टीका करत असून नागरिकांनीही सिंह यांचा निषेध केला आहे. त्यावर आता भाचप काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI