AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये नशीब बदललं नाही, आता शिवसेनेत बदलणार असेल तर शुभेच्छा, प्रितम मुंडेंचा उर्मिलाला टोमणा

"अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या (Urmila Matondkar) प्रवेशामुळे शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा", असं म्हणत भाजप खासदार उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला टोमणा मारला.

काँग्रेसमध्ये नशीब बदललं नाही, आता शिवसेनेत बदलणार असेल तर शुभेच्छा, प्रितम मुंडेंचा उर्मिलाला टोमणा
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Nov 30, 2020 | 3:55 PM
Share

जालना :उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशानं शिवसेनेचं (Shivsena) नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा” (Pritam Munde Criticize Shivsena), असं म्हणत खासदार प्रितम मुंडे यांनी  शिवसेनेला टोमणा लगावला आहे (Pritam Munde Criticize Shivsena).

“अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या (Urmila Matondkar) प्रवेशामुळे शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं म्हणत भाजप खासदार उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला टोमणा मारला. “उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला त्यांनी काँग्रेसकडून नशीब आजमावून पाहिलं. आता शिवसेनेत गेल्यानं त्यांचं स्वत:चं नशीब किंवा शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं त्या म्हणाल्या.

राज्य सरकारची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती : प्रितम मुंडे

राज्य सरकारची ही वर्षपूर्ती जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती असल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त प्रितम मुंडे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. “कुठल्याच बाबतीत हे सरकार चांगलं काम करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे” अशी टीका प्रितम मुंडे यांनी केली.

त्याचबरोबर लवकरच आपल्या कर्मानं हे जिथून आले तिथे परत जातील आणि भारतीय जनता पार्टी ही आपल्याला सत्तास्थानी दिसेल, असं प्रितम मुंडे यांनी म्हंटलं.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिलाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला उद्या शिवबंधन हाती बांधणार आहे.

Pritam Munde Criticize Shivsena

संबंधित बातम्या :

सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला, हाच त्यांचा पायगुण; राणेंची जळजळीत टीका

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...